मृत्यूनंतर होते काय? ऑनलाईन सर्च करूनही समाधान नाही, 10 हून अधिक भाषा येणार्या तरुणीच्या कृत्याने हादरले राज्य
Nagpur Crime 'What Happens After Death' : ही ऑनलाईन पिढी आहे, असे आपण सहज म्हणतो. पण ते काय सर्च करतात याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. नागपूरमधील आरबीआयच्या मोठ्या हुद्दावरील एकुलत्या एक मुलीने केलेले हे कृत्य तुमच्या हृदयाला पीळ पाडेल.
![मृत्यूनंतर होते काय? ऑनलाईन सर्च करूनही समाधान नाही, 10 हून अधिक भाषा येणार्या तरुणीच्या कृत्याने हादरले राज्य मृत्यूनंतर होते काय? ऑनलाईन सर्च करूनही समाधान नाही, 10 हून अधिक भाषा येणार्या तरुणीच्या कृत्याने हादरले राज्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Nagpur-Crime-What-Happens-After-Death-Online.jpg?w=1280)
मृत्यूनंतर होते तरी काय? या प्रश्नाने तिची झोप उडवली. ती सातत्याने ऑनलाईन याच प्रश्नाचे उत्तर शोधत होती. अनेक पुस्तके, व्हिडिओ, गुगल सर्च तिने केले. ती नागपूरमधील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एक बड्या हुद्दावरील एकुलती एक मुलगी होती. ती वारंवार मृत्यू आणि परदेशी संस्कृती याचा शोध घेत होती. आणि तिने मृत्यूनंतर नेमकं काय होतं, हे शोधण्यासाठी आत्महत्या केली. तिने ज्या प्रकार स्वत:ला संपवले ते क्लेशदायकच नाही तर धक्कादायक आहे. या बहुभाषिक तरुणीच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला.
10 पेक्षा जास्त भाषा अवगत
17 वर्षाची ही तरुणी आरबीआयच्या प्रादेशिक संचालकांची मुलगी होती. ती सध्या इयत्ता 12 वीत शिकत होती. तिला 10 पेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. ती चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीची होती. अभ्यासातही ती पुढे होती. तिला युरोपियन संस्कृतीत रस होता. तिचे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच नागपूरमध्ये आले होते. आई-वडिलांसोबत ती छत्रपती नगर परिसरात राहत होती.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Gold-Silver-Rate-Today-29-January-2025.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Pandharpur-Temple-Visit.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/ISRO-NVS-02-Orbit-GSLV-F15-Navigation-Satellite.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Anjali-Damania-Attack-on-Dhananjay-Munde-1.jpg)
एका प्रश्नाच्या शोधासाठी संपवले जीवन
मृत्यूनंतर होते काय? या प्रश्नाने तिची झोप उडवली होती. या मुलीने अगोदर मनगटावर स्टोन ब्लेड चाकूने क्रॉस मार्क केला. यानंतर गळा चिरून आत्महत्या केली. खोलीतून जप्त करण्यात आलेला चाकू हा बाजारात आढळून येत नाही. तो तिने ऑनलाईन मागवल्याचा अंदाज आहे. सायबर पोलीस मोबाईलचा तपास करत आहेत.
अन् तिने स्वत:ला संपवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर येत आहे. सोमवारी पहाटे 5:45 वाजता तिची आई तिला उठवण्यासाठी गेली होती. तेव्हा ती बिछान्यावर रक्ताच्या थारोळ्यात दिसली. आईने आरडाओरड केली. तेव्हा वडीलही खोलीत दाखल झाले. त्यानंतर धंतोली पोलीस घटनास्थळी धावले. सुरुवातीला तिने आत्महत्या कशाने केली हे मोठं कोडं होतं. पण नंतर पोलिसांनी तिची सोशल मीडियावरील सक्रियता तपासली. तेव्हा मृत्यूनंतर होते काय? या प्रश्नाभोवतीचे तिचे ऑनलाईन सर्च समोर आले. पोलीस याप्रकरणात तपास करत आहेत.