आधी कडाक्याचं भांडण आणि आता पक्के शेजारी!; अधिवेशन काळात अजितदादांशेजारी ‘या’ नेत्याचं कार्यालय

Nagpur Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar Office : फुटीनंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकाच कार्यालयात बसणार आहेत. सध्या हिवाळी विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात अजितदादांशेजारी 'या' नेत्याचं कार्यालय आहे. वाचा सविस्तर बातमी...

आधी कडाक्याचं भांडण आणि आता पक्के शेजारी!; अधिवेशन काळात अजितदादांशेजारी 'या' नेत्याचं कार्यालय
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 9:43 AM

गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 डिसेंबर 2023 :अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात राष्ट्रवादी विभागली गेली. या दोन गटांमध्ये कधी आरोपप्रत्यारोप तर कधी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. नुकतंच अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर आता हे दोन नेते शेजारी-शेजारी बसणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार आहेत.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. अशातच नागपूर विधानभवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांचं कार्यालय शेजारी आहे. या दोघांच्याही नावाची पाटी लागली आहे. आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही गटाच्या नेत्यांची नेमप्लेट लागली आहे. काल कार्यालयावर दादा गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट लागल्याने शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाला अजित पवार यांच्या शेजारी कार्यालय देण्यात आलं आहे.

काल कार्यालयावर दादा गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट लागल्याने शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाला अजित पवार यांच्या शेजारी कार्यालय देण्यात आलं आहे.

अजितदादा आणि आव्हाडांमधील वाद काय?

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मागच्या काही दिवसांपासून ढेरीवरून शाब्दिक चकमक सुरु आहे, अशातच आता हे दोन नेते शेजारी-शेजारी असणाऱ्या कार्यलयात बसणार आहेत. नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये शरद पवारांची सभा झाली. त्यावेळी जितेंद्र आव्हाड बाजूला उभे होते. या सभेतील फोटोवरून अजित पवारांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावर टीका करणारं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याला आव्हाडांनीही प्रत्युत्तर दिलंय.

दादा, त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील. पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो…, असं ट्विट करत आव्हाडांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. या सगळ्या वादानंतर आता हे दोन नेते शेजारच्या कार्यलयात बसणार आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.