“सगळे मिळून सभा यशस्वी करणार;’मविआ’तील नेत्यानं या सभेविषयी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं

महाविकास आघाडीच्या सभेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची ही सभा आठ एकरात होत आहे. त्यामुळे एक लाख लोकं येतील, त्याच बरोबर संभाजीनगरपेक्षाही मोठी सभा ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सगळे मिळून सभा यशस्वी करणार;'मविआ'तील नेत्यानं या सभेविषयी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 7:06 PM

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी, मालेगावमध्ये सभा झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमध्येही जंगी सभा होणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेते सभेच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे की, महाविकास आघाडीची ही सभा आम्ही सगळे मिळून ही सभा यशस्वी करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. त्यामुळे या सभेतही उच्चांकी गर्दी होणार असून विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांसह नेते सभेला उपस्थित राहणार असल्याचा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, रत्नागिरी आणि मालेगावमधील सभेप्रमाणेचयाही सभेत मोठी गर्दी होणार असल्याचे त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते या वज्रमूठ सभेसाठी येणार असून या सभेसाठी संपूर्ण विदर्भातील लोकं सभेला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच केंद्रातील भाजपच्या सरकारलाही लोकं कंटाळली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात परिवर्तन झाल्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि केंद्रावर निशाणा साधताना त्यांनी जातीपातीवरून चाललेल्या राजकारणावरूनही केंद्राला घेरले आहे. त्यामुळे जात-पात धर्मात दरी निर्माण करणाऱ्यांना धरीत ढकलल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास असल्यामुळेच असंख्य नागरिक त्यांच्या सभेसाठी जमा होत असतात. त्याच बरोबर शिंदे-फडणवीस सरकारने ज्या प्रकारे अनेक सवाल उपस्थित करून ठेवले आहेत.

त्याच प्रमाणे अनेक अनुत्तरित प्रश्नांचीही उत्तरं या सभेत देण्यात येतील असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. त्याच बरोबर ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही या सभेला येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जातात मात्र हे आरोप करताना सत्ताधाऱ्यांची संकुचित वृत्ती दिसून येते आहे असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

विरोधकांवर टीका करणे, महाविकास आघाडीवर टीका करणे एवढचं काम सध्या सत्ताधारी करत आहेत. मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरु असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

यावेळी महाविकास आघाडीच्या सभेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची ही सभा आठ एकरात होत आहे. त्यामुळे एक लाख लोकं येतील, त्याच बरोबर संभाजीनगरपेक्षाही मोठी सभा ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.