Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur News : नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 जणांचा मृत्यू; रुग्णांचे नातेवाईक संतापले

Nagpur mayo hospital Govt Medical hospital Death Case News : आधी नांदेड, मग छत्रपती संभाजीनगर अन् आता नागपूरात रुग्णाचं मृत्यू सत्र सुरुच. सरकारी रूग्णालयातील मृत्यूची आकडेवारी समोर आली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येमनुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सरकारी व्यवस्थेवर टीका करण्यात येत आहे.

Nagpur News : नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 जणांचा मृत्यू; रुग्णांचे नातेवाईक संतापले
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 9:48 AM

नागपूर | 04 ऑक्टोबर 2023, गजानन उमाटे : नांदेडमधील सरकारी रूग्णालयातील मृत्यू प्रकरण ताजं असतानाच नागपुरातही सरकारी रूग्णालयात रूग्णांच्या मृत्यूबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल रूग्णालयात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मेयो रूग्णालयात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रूग्णालयातून अत्यावस्थ या ठिकाणी येतात. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं रूग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक संतापले आहेत. राज्यात एका पाठोपाठ एका शहरात रूग्णाच्या मृत्यूंची समोर येणारी आकडेवारी ही धक्कादायक आहे. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. सरकारने या मृत्यूंची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये नागपूरच्या शहर आणि ग्रामिण भागातून तसंच मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातूनही इथे रुग्ण येत असतात. पण मागच्या वर्षभराची सरासरी जर पाहिली तर मृत्यूंची संख्या हीच आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढली नसल्याचा दावा रूग्णालयाकडून करण्यात येत आहे. मात्र आपल्या जवळची माणसं गमावल्याने यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नांदेडमध्ये काय घडलं?

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे या मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल याच रुग्णालयात 7 मृत्यूंची नोंद झाली. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी

नांदेडमधील रुग्णांच्या मृ्त्यूप्रकरण ताजं असतानाच काल छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश होता. बाहेरील रुग्णालयातून घाटीत रेफर केलेल्या रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या या रूग्णांना या सरकारी रूग्णालयात पाठवलं जातं. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात येतंय. दरम्यान घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे.

'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.