नागपुरातील राजकारण्यांना अच्छे दिन, नव्या प्रभारचनेमुळे 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता

नगरसेवक व्हायची इच्छा असणाऱ्या नागपूरमधील राजकारण्यांसाठी चांगली बातमी आहे. नागपूर महापालिकेतील नगरसवेकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

नागपुरातील राजकारण्यांना अच्छे दिन, नव्या प्रभारचनेमुळे 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 7:31 AM

नागपूर: नगरसेवक व्हायची इच्छा असणाऱ्या नागपूरमधील राजकारण्यांसाठी चांगली बातमी आहे. नागपूर महापालिकेतील नगरसवेकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. नव्या प्रभागरचनेत नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यानं 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपनं सत्ता राखण्यासाठी तयारी सुरु केलीय. तर, विरोधी काँग्रेसनं देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केलीय. नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यानं दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये देखील वाढ होणार आहे.

2011 च्या लोकसंख्येनुसार नवीन वॉर्ड रचना

नागपूर महापालिकेची सध्याची सदस्य संख्या 151 आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार वार्ड रचना होणार असल्यानं नागपूर महानगरपालिकेत 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यास इच्छूक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार नवीन वॉर्ड रचना करण्यास मंजुरी मिळाल्यास नव्या प्रभाग रचनेत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या 151 नगरसेवक आहेत, ती संख्या 166 होण्याची शक्यता आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचे तत्कालीन महापौर आणि उमेदवार संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर भाजप सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तरुणांचे मेळावे आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनं एक प्रकारे मिशन नागपूर महापालिका सुरु केलेय.

50 हजार तरुणांची फळी तयार करणार

भाजपच्या वतीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे सुरु करण्यात आले आहेत. भाजप नागपूर जिल्ह्यात 50 हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार आहे. एका बुथवर 25 तरुणांची फळी काम करेल. त्यादृष्टीनं भाजपची तयारी सुरु असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

महाविकासआघाडी सरकारला टक्कर देण्याची तयारी

भाजपच्या वतीनं एका बुथवर 25 तरुणांची फळी तयार करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावतीनं ही माहिती देण्यात आली आहे. 18 ते 25 वयोगटातील नव्या मतदारांवर भाजपा डोळा असून महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपची तयारी सुरु आहे.

नागपूर महापालिका पक्षीय बलाबल एकूण सदस्य: 151

भाजप :108

काँग्रेस: 29

बसपा : 10

इतर :04

इतर बातम्या:

भाजपचं मिशन नागपूर महापालिका, युवा वॉरिअर्सची फळी उभारणार,चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक

Nagpur Municipal Corporation corporator numbers increased by 15 due to new ward system

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.