नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी फोडला बाँब, भाजपची सत्ता उलथविण्याचा प्लान सांगितला
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केलीय. उभेच्छुकांकडून अर्ज वितरित केले जात आहेत. गरज पडल्यास भाजप, शिवसेनेतून येणाऱ्यांनाही तिकीट देण्यात असल्याचं काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे (City President Vikas Thackeray) यांनी सांगितलं.
नागपूर : काँग्रेसचं मिशन नागपूर महानगरपालिका (Municipal Corporation) सुरू झालंय. नागपूर मनपातील पंधरा वर्षांची भाजपची सत्ता उलथवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली. नागपुरातील भाजप आणि शिवसेनेचे पंधरा आजी- माजी नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (City President Vikas Thackeray,) यांनी केलाय. उमेदवार निवडीसाठी काँग्रेस नागपुरात सर्वे सुरू करणार, असंही विकास ठाकरे यांनी सांगितलंय. ठाकरे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तिकिटासाठी कुठे काही जुगाड जमते का, याची चाचपणी करणारे काही इच्छुक असतात. कोणत्या भागात काँग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करणार याची यादी आहे. तरीही कंपनीला उमेदवारांचे सर्वे करण्यासाठी काम दिलेलं आहे. कोण सश्रम उमेदवार निवडूण येणार याची चाचपणी केली जाणार आहे. रिपोर्ट तयार झाल्यानंतर हायकमांडला यासंदर्भात कळविण्यात येईल. गेल्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे काही लोकं काँग्रेसमध्ये आले. त्यांना आम्ही तिकीट दिल्या होत्या. राष्ट्रवादीचे काही लोकं काँग्रेसमध्ये (Congress) आले होते. त्यांना काँग्रेसनं तिकीट दिल्या होत्या.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान करणार नाही
या मनपा निवडणुकीसाठी काही लोकं काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तरीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही, हा दृष्टिकोन समोर ठेऊन आम्ही हा निर्णय घेणार आहोत, असंही विकास ठाकरे यांनी सांगितलं. भाजपचं नव्हे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही लोकं काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तिकीट हवी, यासाठी ते संपर्कात आहेत. ज्या कंपनीला सर्वेचं काम देणार आहोत, ती कंपनी प्रभागात जाईल. कोणत्या उभेच्छुकांची काय हवा आहे, याचा आढावा घेण्यात येईल, असंही ठाकरे यांनी सांगितलं. देवडिया भवनात दररोज यांसकाळी साडेपाच ते साडेसात या वेळात काँग्रेसच्या उमेदवारांना अर्ज मिळणार आहेत. जे उभेच्छुक आहेत त्यांनी अर्ज घेऊन जावे, असंही ठाकरे यांनी कळविले आहे.
कृष्णा खोपडेंचे संजय राऊतांना प्रत्यूत्तर
विदर्भात भाजपच्या भरवशावर निवडूण येणाऱ्यांनी शहानपण जास्त सांगू नये. असा टोला भाजपचे आमदार कृष्णा खोडपे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना लगावला. नागपूर मनपात शिवसेनेचे दोनपेक्षा जास्त नगरसेवक निवडूण आले नाहीत. त्यामुळं संजय राऊत यांनी विदर्भाच्या जनतेला शहाणपण शिकवू नये, असंही खोपडे म्हणाले. असे संजय राऊत कित्येक येऊन गेलेत. विदर्भात भाजप सोबत लढली तेव्हा सेना वाढली, एकटी लढली नेस्तनाबूत झाली, हा नागपूरचा इतिहास असल्याची आठवण खोपडे यांनी करून दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजप नेते आ. कृष्णा खोपडे यांनी असं सडेतोड उत्तर दिलंय.