AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर मनपा निवडणूक, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती काय?

भाजपने विधानसभानिहाय निवडणुकीची आखणी केली आहे. माजी आमदार अनिल सोले हे पूर्व नागपुरात मुलाखती घेत आहेत. पूर्व नागपुरात शुक्रवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

नागपूर मनपा निवडणूक, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती काय?
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मुलाखती सुरू केल्या आहेत. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 10:12 AM
Share

नागपूर : ओबीसींना राजकीय आरक्षण (Political Reservation for OBCs) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळं नागपूर महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता वाढली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ चार मार्च रोजी संपला. त्यामुळं हे नगरसेवक आता माजी झाले. बहुतेक सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मोडमध्ये आले आहेत. काँग्रेसने उमेदवारी अर्ज (Congress Candidate Application) देण्यास सुरुवात केली. बसपानेही त्यासाठी पुढाकार घेतला. आता भाजपने सरळ मुलाखती (BJP Interviews) सुरू केल्या आहेत. ज्या उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे त्यांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे. आधी दक्षिण-पश्चिम भागात या मुलाखती घेण्यात आल्या. आता पूर्व नागपुरात मुलाखती घेतल्या जात आहेत.

पूर्व नागपुरात साडेतीनशे उमेदवार भाजपकडून इच्छुक

प्रभाग रचनेत काही बदल झालेत. आधी चार सदस्य एका प्रभागात होते. आता तीन सदस्य एका प्रभागात राहणार आहेत. त्यामुळं सक्षम उमेदवारांसाठी शोधाशोध सुरू झाली आहे. भाजपने विधानसभानिहाय निवडणुकीची आखणी केली आहे. माजी आमदार अनिल सोले हे पूर्व नागपुरात मुलाखती घेत आहेत. पूर्व नागपुरात शुक्रवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. साडेतीनशेहून अधिक बूथ प्रमुखांनी उमेदवारी मागितल्याची माहिती आहे. त्यामुळं आता तिकीट कुणाला मिळते. नाराज उमेदवार दुसऱ्या पक्षांच्या तिकिटाची तयारी करण्याची शक्यता आहे. शिवाय काही जण अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसची वेट अँड वॉचची भूमिका

मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसने सुरुवातीलाच अर्ज वितरण सुरू केले. काँग्रेसची तिकीट हवी असल्यास आधी अर्ज घेऊन जा, असे आवाहन करण्यात आले. इच्छुक उमेदवार देवडिया भवनातून अर्ज आणत आहेत. शिवसेनाही उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. शिवसेनेचे काही जुने कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात मात्र, शांतता दिसून येत आहे. बसपा, आप, वंचित बहुजन आघाडी, इंडियन मुस्लीम लिग हे पक्षही निवडणुकीची तयारी करत आहेत.

नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, काय आहे प्रकरण?

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.