नागपूर मनपाच्या कारभारणींनी घेतला आढावा, महिला व बालकल्याणाच्या योजना कुठपर्यंत?

नागपूर महापालिकेतर्फे महिला व बालकल्याण विशेष समितीअंतर्गत महिला बचत गट, दिव्यांग आणि गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासंदर्भात महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी आढावा घेतला.

नागपूर मनपाच्या कारभारणींनी घेतला आढावा, महिला व बालकल्याणाच्या योजना कुठपर्यंत?
महिला व बालकल्यणाच्या योजनांचा आढावा घेताना नागपुरातील नगरसेविका.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 5:04 PM

नागपूर : मनपा मुख्यालयातील महिला व बालकल्याण समिती (Women and Child Welfare Committee) कक्षात सभापती दिव्या धुरडे (Chairperson Divya Dhurde) यांच्या अध्यक्षेत समाज विकास विभागाची सोमवारी बैठक पार पडली. समितीच्या उपसभापती अर्चना पाठक, सदस्या उज्वला शर्मा, निरंजन पाटील, रुपाली ठाकूर, सोनाली कडू, प्रणिता शहाणे, स्नेहा निकोसे, मंगला लांजेवार, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, सहायक अधीक्षक सुरेंद्र सरदारे, उच्च श्रेणी लिपिक शारदा गडकर आदी उपस्थित होते. बैठकीत महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी दहाही झोन झोनस्तरावर फूड स्टॉल कँटिंग सुरू करणे, नवीन वर्षात गरजू महिलांना शिवणयंत्राचे वाटप (Distribution of Sewing Machine to Women), मनपा मुख्यालय परिसरात महिला व बालक यांच्याकरिता फिडींग रूम तयार करणे, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यासारख्या विविध विषयांवर आढावा घेतला.

कॅटरिंगसाठी पाच झोनमधून प्रस्ताव

फूड स्टॉल कॅटरिंगसाठी आतापर्यंत समाजविकास विभागाकडे पाच झोनमधून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यात धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनचा समावेश आहे. तसेच पिको फॉल, काचबटन शिवणयंत्र वाटप योजनेअंतर्गत प्रथम टप्यात 213 लाभार्थ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. सोबतच शुक्रवारी 9 महिला लाभार्थींचे देयक प्राप्त झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यातील 30 महिला लाभार्थ्यांची यादी मंजुरीकरिता पाठविण्यात आलेली आहे. एकूण 243 गरजू महिलांना शिवणयंत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर यांनी दिली.

50 दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश

अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 50 दिव्यांग लाभार्थ्यांना महापौरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. तसेच पुढील आठवड्यात 25 लाभार्थ्यांना त्यानंतर आणखी 25 दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळालेल्या 10 दिव्यांगांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आलेले आहेत, अशी माहितीसुद्धा दिनकर उमरेडकर यांनी यावेळी दिली.

Video – युक्रेनमध्ये अडकलेले विदर्भातील 2 विद्यार्थी नागपुरात परतले, विमानतळावर जल्लोषात स्वागत

नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळा, सातव्या आरोपीला अटक, तीन मार्चपर्यंत कोठडी

Video – अमरावतीमध्ये चोरट्यांनी फोडल्या दोन बँका! तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.