नागपुरातून कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय!, डॉक्टर, परिचारिकांना सेवामुक्त करण्याचे कारण काय?

कोरोनाची तिसरी लाट संपताच चाळीस डॉक्टर्स आणि 53 परिचारिकांना सेवामुक्त (Doctors & Nurses Retired) करण्यात आले. कोरोना संक्रमणादरम्यान, महापालिकेने 47 डॉक्टर्स आणि 186 परिचारिकांची नियुक्ती केली होती.

नागपुरातून कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय!, डॉक्टर, परिचारिकांना सेवामुक्त करण्याचे कारण काय?
नागपूर महापालिकाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:49 AM

नागपूर : कोरोना संक्रमणाशी लढा देण्यासाठी नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) सत्तेचाळीस डॉक्टर्सची नेमणूक केली होती. त्यांना साठ हजार रुपये मासिक मानधन मिळत होते. शिवाय चाळीस हजार रुपये अधिकचे मानधन देण्यात येत होते. याशिवाय अतिरिक्त 186 परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली होती. या परिचारिकांना शासनाकडून मासिक 30 हजार वेतन दिले जाते. याशिवाय महापालिकेकडून पाच हजार रुपये अतिरिक्त मानधन दिले जात होते. तिसर्‍या लाटेशी लढण्यासाठी महापालिकेने ही तयारी केली होती. आता तिसरी लाट ओसरत आहे. शिवाय कोरोना सर्दी खोकल्यासारखा आजार झाल्याचे दिसून येत आहे. रुग्ण असले, तरी मृत्यूदर किंवा रुग्णालयात भरत होण्याचा दर खूपच कमी आहे. त्यामुळं महापालिकेवर अतिरिक्त खर्च नको म्हणून 40 डॉक्टर व 53 परिचारिकांना सेवामुक्त (Doctors & Nurses Retired) करण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर (Standing Committee Chairman Prakash Bhoyar) यांनी घेतला आहे.

मनपावर नव्वद लाखांचा अतिरिक्त बोजा

कोरोना कालावधीत 436 कर्मचारी व 862 आशा वर्कर यांचीही सेवा महापालिकेने घेतली होती. या कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. महापालिकेने प्रत्येकी दीड हजार रुपये, तर आशा वर्करला एक हजार रुपये दरमहा अतिरिक्त मानधन दिला. कोरोनाचे संक्रमण अतिशय धोकादायक परिस्थितीत होते. या कालावधीत स्थायी समितीने ही विशेष मंजुरी दिली होती. यामुळे महापालिकेवर 90 लाख सोळा हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा बसत होता. आता गरज संपताच महापालिकेने आर्थिक कारण सांगून या कर्मचार्‍यांना सेवामुक्त करण्यात आले.

मनपाचा आर्थिक परिस्थिती गंभीर

कोरोनाशी लढण्यासाठी नागपूर महापालिकेने आरोग्य कर्मचारी नेमले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही भयानक होती. आता तिसरी लाटही येऊन गेली. ही तिसरी लाट संपताच चाळीस डॉक्टर्स आणि 53 परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले. कोरोना संक्रमणादरम्यान, महापालिकेने 47 डॉक्टर्स आणि 186 परिचारिकांची नियुक्ती केली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती फारसी चांगली नाही, असे कारण देऊन ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार, आणखी राज्यात किती प्रकल्प आणि निधीची व्यवस्था काय?

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची दहशत, दोन दिवसांत तिघांचा घेतला जीव, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला?

घरकुलाचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, प्राजक्त तनपुरे यांनी दिले आश्वासन, नागपुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.