नागपूर मनपा झोपडपट्टी भागात सुरु करणार इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आकांक्षा फाऊंडेशनसोबत झाला सामंजस्य करार
यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून नागपूर महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नागपूर : यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून नागपूर महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशनमध्ये याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. (Nagpur Municipal Corporation will start Six English medium school in slum area)
केजी वन ते इयत्ता पहिलीचे वर्ग लवकरच सुरु होणार
नागपूर महापालिकेतर्फे शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा इंग्रजी शाळा सुरु करण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार आता या शाळांमध्ये केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून या शाळा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील झोपडपट्टी भागामध्ये या शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशनमध्ये झाला सामंजस्य करार
नागपूर महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडवणारा ठरणार आहे. हा महत्त्वाचा विषय मार्गी लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने नागपूर मनपा या शाळा सुरु करणार असून दोघांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात भेसळ
पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील तांदळात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मोखाडा तालुक्यातील खोडाळा वाकडपाडा येथे ही घटना समोर आली. हा तांदूळ प्लास्टिकचा असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप झालाय. त्यामुळे या तांदूळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील पालकांकडून करण्यात येत आहे
इतर बातम्या :
भरधाव बाईकसह थेट तलावात उडी, आत्महत्येचा संशय, बाईक सापडली, तरुणाचा शोध सुरु
नागपूरची तुंबई कुणी केली? एकाच पावसात वस्त्यांमध्ये पाणी, रस्ते पाण्याखाली, मुंबई होतेय?
(Nagpur Municipal Corporation will start Six English medium school in slum area)
VIDEO: भरदिवसा धारधार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलंhttps://t.co/1ER9hgy7ar#PimpriChinchwad #Pune #Murder
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021