Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणूक, नवीन प्रभाग रचनेचा परिणाम; कोणत्या प्रभागातून लढायचं यावरून संभ्रम

निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्यानं नगरसेवकांनी विकासकामांचे भूमिपूजन उरकून टाकले. पण, कामे अद्याप व्हायची आहेत. नुसते भूमिपूजनाचे फोटो सोशल मीडियावर टाकणारे नगरसेवकही अडचणीत आले आहेत.

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणूक, नवीन प्रभाग रचनेचा परिणाम; कोणत्या प्रभागातून लढायचं यावरून संभ्रम
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:00 AM

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत आधी एका प्रभागातून चार नगरसेवक (Four councilors from one ward) निवडूण येत होते. यावेळी प्रभाग रचना बदलली. एक प्रभाग हा तीन नगरसेवकांसाठी ठेवण्यात आलाय. प्रभाग रचनेमुळं (Due to ward structure) जुन्या प्रभागाला तडे गेलेत. काही भाग दुसऱ्या प्रभागात गेला. नवीन प्रभाग जोडल्या गेल्या. जुन्यातील काही भाग दुसऱ्या प्रभागात गेला. यामुळं कोणत्या प्रभागातून लढायचं यावरून नगरसेवकांमध्ये संभ्रम (Confusion among corporators) आहे. काही प्रभागातील सत्तर टक्के, तर काही प्रभागातील तीस टक्के भाग बदलला आहे. त्यामुळं जास्त जुना भाग असलेल्या प्रभागाला उभे राहण्यासाठी प्राधान्य द्यावे लागेल. पण, पक्षाची तिकीट मिळाली तर ठिक. त्यातही पत्ता कट झाल्यास कसं होणार याची चिंता विद्यमान नगरसेवकांना सतावत आहे.

भूमिपूजन झाले कामे केव्हा होणार

निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्यानं नगरसेवकांनी विकासकामांचे भूमिपूजन उरकून टाकले. पण, कामे अद्याप व्हायची आहेत. नुसते भूमिपूजनाचे फोटो सोशल मीडियावर टाकणारे नगरसेवकही अडचणीत आले आहेत. कारण कामे झालीत कुठं अशी दुसरी पोस्ट काही जागृक नागरिक टाकत आहेत. त्यामुळं नगरसेवकांची गोची होत आहे. शिवाय काही भाग नव्यानं जोडण्यात आल्यानं त्या भागाकडं लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याठिकाणी भेटीगोटी वाढविण्यात आल्या.

आता नजरा आरक्षण सोडतीवर

प्रभाग रचनेवरील आक्षेप मागविण्यात आले आहेत. परंतु, त्यात काही फारसे बदल होतील, असं नाही. त्यामुळं सोयीचा प्रभाग कोणता, त्यावर नगरसेवकांनी फोकस केलंय. प्रभागातील समस्या कोणत्या आहेत. प्रलंबित विकासकामे कशी मार्गी लावता येतील. याकडं त्यांचं लक्ष आहे. नागपूर महापालिकेत 52 प्रभागातून 156 नगरसेवक निवडूण येणार आहेत. यापैकी 78 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्व प्रभागात एक जागा महिलेसाठी राखीव आहे. 26 प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. या सर्व बाबींचा विचार करता आता आरक्षण सोडतीवर सर्वांच लक्ष आहे. आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत विद्यमान नगरसेवक आणि उभेच्छूक गॅसवर आहेत. कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. भाऊ, ताई यंदा लढायचंच, असा चंग काही उभेच्छुकांना बांधलाय. त्यांचा उत्साह कार्यकर्तेही वाढवत आहेत.

नागपूर शहरातील भोसलेकालीन सर्व विहिरींचे संवर्धन होणार; महापालिकेची नेमकी योजना काय?

Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?

Nagpur Crime | नागपुरात गेस्ट हाऊसमध्ये जुगाराचा डाव, पोलिसांच्या छाप्यात सापडलं काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.