“उद्धव ठाकरे विदर्भाचे गद्दार, त्यांनी विदर्भातील शिवसैनिकांची माफी मागावी!”

Narendra Bondekar on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदाराने त्यांनीवर टीका केली आहे. थेट माफीची मागणी त्यांनी केलीय. तसंच ठाकरेंनी विदर्भावर अन्याय केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर..

उद्धव ठाकरे विदर्भाचे गद्दार, त्यांनी विदर्भातील शिवसैनिकांची माफी मागावी!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या या निवडणुकीत ठाकरे गट पिछाडीवर असल्याचं दिसतंय. या निकालांमध्ये ठाकरेंची शिवसेना पाचव्या स्थानावर आहे.
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 1:37 PM

गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 09 नोव्हेंबर 2023 : शिवसेना पक्ष फुटला अन् शिंदे गट भाजपसोबत गेला. तेव्हापासून शिंदेगटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना डावललं. काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे आम्ही शिवसेना पक्ष सोडला असा घणाघात शिंदे गटातील नेत्यांनी केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे विदर्भाचे गद्दार आहेत. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात सभा घेणार असल्याचं सांगितल्यानंतर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे विदर्भाचे गद्दार आहेत. त्यांनी आधी विदर्भातील शिवसैनीकांची माफी मागावी. 2019 च्या निवडणुकीत मी जिल्हाप्रमुख होतो. तिकीट तर सोडाच. पण उमेदवार उभे करायचे होते. तर तुमचा फोन स्विच ॲाफ होता. तुमच्याशी संपर्क करता आला नाही, असं नरेंद्र बोंडेकर म्हणाले आहेत.

विदर्भावर अन्याय करुन मुंबईची सत्ता मिळवायची कशी? हात उद्धव ठाकरेंचा धंदा राहिला आहे. त्यांनी कायम विदर्भावर अन्याय केला. गद्दार वगैरे शब्द त्यांनी वापरु नयेत. त्यांना तो अधिकार नाही, असं नरेंद्र बोंडेकर म्हणालेत.

“तुमचा आमच्यावर अधिकार नाही”

तुमचा आमच्यावर अधिकार नाही. आम्ही अपक्ष निवडून आलोय. गद्दार म्हणण्याचा प्रश्न नाही. भंडारा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचं आम्ही स्वागत करतो. आधी त्यांनी उरलेली शिवसेना वाचवायला पाहिजे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं काही झालं नाही. ते विदर्भाचं काय भलं करणार?, असा सवाल नरेंद्र बोंडेकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे भंडाऱ्यात येत आहेत. मात्र ते इकडे येऊन त्याचं काही फरक पडणार नाही. लोकांना त्यांचं काम आणि आमचं काम माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असं नरेंद्र बोंडेकर म्हणाले आहेत.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....