“पुढील 50 वर्षात या रस्त्यावर एक पैसाही खर्च करावा लागणार नाही”; उपमुख्यमंत्र्यांनी या शहराच्या विकासाचा चेहरामोहरा सांगितला
आपण विदर्भामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर निधी देत आहोत.आपलं सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा आले तेव्हा त्यांनीही विदर्भाकडे दुर्लक्ष केलं. मात्र आज आपण हजारो कोटी रुपये विदर्भाच्या विकासाला देत असल्याचे अश्वासन दिले आहे.
नागपूर : पुढील 50 वर्षात नागपूरच्या रस्त्यावर एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यामुळे नागपूरचा चेहरामोहरा बदलून गेला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या नागपूरमधील कार्यक्रमात व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर सर्वार्थाने बदलून गेले आहे. नागपूर शहरामधील सगळे रस्ते आता सिमेंटचे झाले असून पुढील काही वर्षे रस्त्यावर पैसा खर्च करायची गरज नाही असे गौरवोद्गगारही त्यांनी यावेळी काढले.
नागपूर शहराचा विकास होण्यामध्ये नितिन गडकरी यांचा हात मोठा आहे. नितिन गडकरी यांच्या सहकार्यामुळे आम्ही डबल इंजिनने काम केलं असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मध्यंतरी अडीच वर्षे सरकार नव्हते, तरीही नितिन गडकरी यांच्यामुळे काम वेगाने सुरू होते मात्र महाराष्ट्र सरकारची कोणतीही साथ, पाठिंबा नितीन गडकरी यांना मिळाली नव्हती. मात्र पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि विकासाचा मार्ग खुला झाल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात गतीने काम सुरू केलं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आपण विदर्भामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर निधी देत आहोत.आपलं सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा आले तेव्हा त्यांनीही विदर्भाकडे दुर्लक्ष केलं. मात्र आज आपण हजारो कोटी रुपये विदर्भाच्या विकासाला देत असल्याचे अश्वासन दिले आहे.
यावेळी नितिन गडकरी यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, नितिन गडकरी यांच्यामुळेच नागपूर शहरातील सर्व रस्ते हे सिमेंटे क्राँक्रिटीकरणाचे झाले आहेत. त्यामुळे आता पुढील पन्नास वर्षात रस्त्यासाठी डांबर घाला, टेंडर काढा, ठरलेल्या माणसांनाच क्रॉन्ट्र्रॅक्ट द्या असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.