दिलासादायक ! नागपूर सावरतंय, दिवसभरात 319 नवे रुग्ण, मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट

नागपुरात रुग्णआलेख कमी होताना दिसतोय. तसेच येथे मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. (nagpur corona pandemic corona patients)

दिलासादायक ! नागपूर सावरतंय, दिवसभरात 319 नवे रुग्ण, मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट
nagpur corona update
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 11:00 PM

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona patients) कमी होताना दिसतेय. सध्याच्या आकडेवारीवरुन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचीच प्रचिती सध्या नागपुरात येत आहे. नागपुरात रुग्णआलेख कमी होताना दिसतोय. तसेच येथे मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार आज (31 मे) दिवसभरात फक्त 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. काल हीच संख्या 13 होती. (Nagpur overcoming from second Corona Pandemic wave new Corona patients are decreasing)

नागपुरात रुग्णांच्या संख्येत घट

नागपुरात रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. नव्या रुग्णांचा आलेख रोज घटताना दिसतोय. काल दिवसभरात 357 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. तर एकूण 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आज हीच आकडेवारी कमी झालीये. आज नागपुरात कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीये. तर आज दिवसभरात फक्त 10 बाधितांचा मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर सावरत असून रुग्णसंख्या कमी होत आहे.

महिनाभरापूर्वी रोज 100 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

महिनाभरापूर्वी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. यावेळी नागपूरची परिस्थिती तर फारच गंभीर होती. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण 1 ते 2 मेदरम्यान नागपुरात रोज 5 हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळत होते. तर रोज मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 100 च्या पुढे होती. नागपुरात 2 मे रोजी तब्बल 112 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता तर 5007 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. आता ही संख्या चांगलीच घटली आहे.

नागपुरातील कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी

आज नागपुरात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू

दिवसभरात 319 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

आज 829 जणांनी केली कोरोनावर मात

एकूण रुग्णांची संख्या – 4 लाख 74 हजार 605 वर

कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या -4 लाख 59 हजार 442 वर

एकूण मृत्यूसंख्या – 8 हजार 902

नागपुरात 1 जूनपासून नवी नियमावली

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. याच कारणामुळे य़ेथे येत्या 1 जूनपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आलेयत. त्याबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत न मोडणारे परंतु एकटी दुकानेसुद्धा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. ही दुकाने आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरु ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. मॉल बंदच असतील.

नागपूरमधील नवे नियम कोणते ?

1. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

2. अत्यावश्य सेवेत न मोडणारी एकटी दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहतील. मॉल बंद असेल.

3. कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु असतील.

4. खाद्य पदार्थ, दारू, ई-कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील.

5. माल वाहतूक सुरू असेल.

6. मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्ट बंद असतील.

7. सर्व सरकारी कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू असतील.

8. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील.

इतर बातम्या :

Nagpur Corona New Rules | नागपुरात रुग्णसंख्येत घट, 1 जूनपासून नवी नियमावली, काय बंद काय सुरु ?

दिव्यांगांना लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत राहायची गरज नाही, नागपुरात स्वतंत्र लसीकरण केंद्र

कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी नागपूर प्रशासनाची मोहीम, 2 दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी

(Nagpur overcoming from second Corona Pandemic wave new Corona patients are decreasing)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.