Nagpur Police | नागपूर पोलिसांची धडक कारवाई, दोन दिवसांत 17 गुंड तडीपार! गुन्हेगारांचे धाबे दणाणले
नागपूर पोलिसांनी दोन दिवसात 17 गुंडांना तडीपार करत मोठी कारवाई केली. शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे आता इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
नागपूर : पोलिसांनी गुन्हेगारांचा नायनाट (Annihilation of criminals) करण्याचं जणू डोक्यातच घेतलं आहे. तशाप्रकारे पावलं उचलत पाचही परिमंडळात कारवाई सुरू केली. गेल्या काही दिवसात पोलीस सक्रिय झाले आहेत. मागील दोन दिवसांत जोरदार कारवाई करत 17 गुंडांना तडीपार केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडांना तडीपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या सण आणि उत्सवाचे दिवस सुरू आहेत. अशात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये हा सुद्धा मागचा उद्देश आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे (Police crackdown) गुन्हेगारांची चांगलीच धडकी भरली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी दिली.
6 टोळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई
नागपूर पोलिसांनी या पूर्वी सुद्धा 63 जणांना कारवाई केली आहे. वर्षभरात गुन्हेगारांच्या 6 टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली. अशाच कारवाया पोलिसांच्या नियमित सुरू राहिल्या तर गुन्हेगारांवर वचक बसविण्यात यश येऊ शकेल हे नक्की. मार्च महिन्यात तेरा खून झाले होते. त्यापूर्वीच्या महिन्यात एकही खुनाची घटना घडली नव्हती. एप्रिल महिन्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आधीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांना तडीपार केले आहे.
गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न
फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात एकही खुनाची घटना घडली नव्हती. त्यामुळं पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलावून याची माहिती दिली. पण, मार्च महिना पोलिसांसाठी डोकेदुखी घेऊन आला. एक-दोन नव्हे तर तब्बल अकरा खून मार्च महिन्यात झाला. यावर अंकुश लावणे आवश्यक होते. त्यामुळं आधीच पोलीस आयुक्तांनी गुंडांना तडीपार करण्याचा सपाटा लावला आहे. नागपूर पोलिसांनी दोन दिवसात 17 गुंडांना तडीपार करत मोठी कारवाई केली. शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे आता इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.