यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं पण..; निवडणुकीतील यशानंतर भाजप नेत्याचा नाना पटोलेंवर निशाणा
Sudhir Mungantiwar on Congress Leader Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. तसंच काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात महायुतीला भरघोस यश मिळालं. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निसटता विजय झाला. निकालाआधी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास ज्या लोकांची नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. त्यामुळे नाना पटोलेंच्या नावाचा समावेश होता. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. नाना पटोले हे मुख्यमंत्री होण्याच्या गोष्टी करत होते. आता ते विरोधी पक्षनेते बनू शकत नाहीत. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीला टोला
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूक घेतल्यानंतर अहंकार होता. सरकार दूर दूर पर्यंत येण्याची चिन्ह नसताना मी भावी गृहमंत्री, मी भावी महसूल मंत्री अशा पद्धतीची भाषा होती. विजय नम्रतेने स्वीकारला नाही तर हा विजय पराभवाच्या मार्गाने पुढे जातो, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधानाचा सन्मान करावा लागतो. दहा टक्के पेक्षा कमी जागा निवडून आल्याने विरोध करू शकत नाही. संविधानाचा सन्मान करावा लागेल. काँग्रेसचे निवडून आलेले आमदार बेचैन असणार आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.
उद्धव ठाकरेंना टोला
धूल थी चेहरे पे आयना साफ करते रहे… आपण जे पेरतो आहेय आपल्याच नशिबात आपल्याच वाटेला येईल असं कधी विरोधकांना वाटलं नाही. ज्या पद्धतीने बेइमाने पेरली जनतेने तेच व्याजासकट पराभव स्वरूपात परत केलं. उद्धव ठाकरे यांनी औट घटकेचे राज्य करून काय केलं. त्याचा काय फायदा झाला. त्यांचा नावावर मुख्यमंत्री कसा वागू नये एवढेच त्यांच्या नावावर आज जमा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काँग्रेसने 8500 सांगितले तरीही नाकारले. देशात जनतेने त्यांना मत दिले नाही. कारण काँग्रेस बद्दल विश्वास नाही. काँग्रेस एक धोका आहे. हे लोकांना वाटतं काँग्रेसने 30 हजार देतो म्हटलं असतं तरी त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. या अगोदर त्याच पद्धतीने कर्नाटकमध्ये धोका केला. हिमाचलमध्ये धोका केला त्यांची नीती साफ नाही आहे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.