महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं…

Vijay Wadettiwar on Mahavikas Aghadi and Vidhansaabha Election 2024 : 2024 ला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण?; विजय वडेट्टीवार यांनी सांगून टाकलं... डीपीडीसीच्या निधी वाटपावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार काय म्हणाले? वाचा...

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं...
vijay wadettiwar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 3:28 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी- नागपूर | 01 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच जागावाटप, उमेदवारी आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार याची चर्चा होतेय. राज्यात महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडीचं? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल मात्र जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय. ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल सर्वाधिक जागा आम्ही जिंकू. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी आशा आहे. हे केवळ स्वप्न नाही. तर जनतेच्या आम्हाला प्रतिसाद आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

वडेट्टीवार म्हणाले…

सरकारने कुठल्याही पोस्टवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्या संदर्भातली माहिती घेऊन करावी. रश्मी शुक्लाची नियुक्ती होणार असं ऐकत आहे. त्यामुळे मी अधिक त्यावर सध्या भाष्य करणार नाही. न्यायालयाने क्लीन चिट दिल्याची माहिती सर्वत्र सांगितली जात आहे. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सरकारने टाळाव्यात. जरी त्यांना अधिकार असले तरी आरोप प्रत्यारोप असतील. तर ते टाळलेले बरं, असं माझं मत असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

डीपीडीसीच्या निधी वाटपावर वडेट्टीवार म्हणाले…

डीपीडीसीच्या निधी वाटपावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुन्या कडीला नव्याने उत असा प्रकार सुरू आहे. एकीकडे सत्तेमध्ये राहायचं सत्ता उपभोगायची निधीवरून भांडण दाखवायचं. लोकांच्या प्रश्नांना बगल द्यायची पैशासाठी सत्तेत सहभागी झालेले आहेत. त्यामुळे दुसरा काय करणार?, असं वडेट्टीवार म्हणाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीत वाद होईल. हे मी अगोदरच बोललो आहे. तिन्ही पक्षाचे नेते आहेत. त्यांना अनेकांनाअनेक लोकांना कमळावर लढावं लागेल ज्या पद्धतीने वातावरण सरकार विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठी आहे पुढे वाढत जाईल. यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही. मोदी यांना लोकसभा जिंकून काढायची आहे. त्यानंतर खडाजंगी सुरू होईल, असं ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.