विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे.

विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल
काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 10:16 AM

नागपूर : अमरावतीतील दगडफेक प्रकरणात रजा अकॅदमीवर बंदी आणा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीनं केली जात आहे. यावर अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर यांनी प्रहार केला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हेसुद्वा अशाप्रकारच्या  दंगली घडवितात. त्यामुळे त्यांच्यावरही बंदी का आणू नये, असा सवाल अन्वर यांनी केला. नागपुरात ते पत्रकारांशी काल बोलत होते.

राजकीय फायद्यासाठी दंगली

तारीक अन्वर म्हणाले, संविधानापेक्षा देशात कोणीही मोठा नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नेहमी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. राजकीय लाभ मिळविण्याचा डाव आखला जात आहे. महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. कोरोनाकाळात गंगेत वाहणारे मृतदेह साऱ्यांनी बघीतले. अशा मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. बेरोजगारांची फौज तयार होत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अमरावतीसारख्या दंगली घडवून आणल्या जात आहेत, असा आरोपही अन्वर यांनी यावेळी केली.

काँग्रेसतर्फे जनजागृती अभियान

देशातील समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे 14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत अभियान राबविले जात आहे. यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. या अभियानाच्या प्रचारासाठी तारिक अन्वर नागपुरात आले असता त्यांनी विहिंप, बजरंग दलावर प्रहार केला. निवडणुकीच्या काळात पुलवामा सारखे प्रकरण घडवून आणण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून नेहमी केले जाते, असेही ते म्हणाले. नागपुरात ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.

राज्याकडून इंधन करकपात करण्याचा विचार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, देशात दंगली घडवा आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्या, असा भाजपचा एकसूत्री कार्यक्रम आहे. भाजपतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. केंद्राने आधी इंधनाचे दर वाढविले. नंतर पाच रुपये लीटरमागे कमी केले. राज्य सरकारही इंधनावरील दर कपातीवर विचार करत आहे. राज्याकडून इंधनावरील करकपातीचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत पटोले यांनी दिले.

जिहादींचा राज्य पेटवण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी

उत्तर नागपुरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, ओसीडब्ल्यूने नळजोडणी कापल्याचा आरोप

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.