अंगणवाडीतील बालकांच्या आहारवर कोण डल्ला मारतंय, सीलबंद पॉकेट झुडपात, चोरीचे बिंग फुटण्याच्या भीतीने …
नागपूर जिल्ह्यातील संपुर्ण अंगणवाडीची तपासणी करण्याचं आवाहन नागरिकांनी केलं आहे. त्यामुळे मुलांचा आहार इतरत्र जात असल्याची अनेक प्रकरण उजेडात येतील.
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या येरखेडा (Nagpur yergada) येथे अंगणवाडीतील मुलांना मोफत दिला जाणारा पोषण आहार झुडपात फेकून देण्यात आला आहे. कामठी तालुक्यातील (kamathi) येरखेडा गावातील अंगणवाडी क्रमांक 11 मध्ये आलेले आहाराचे साहित्य लाभार्थ्यांना वाटप न करता परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या दोन घरी आहार लपवून ठेवला होता. याची कुणकुण परिसरातील नागरिकांना लागल्याने त्याची तक्रार ग्रामपंचायतीला केली होती. चोरीचे बिंग फुटण्याच्या भीतीने अंगणवाडी (Anganwadi) सेविकेणे आहाराचे सीलबंद पॉकेटचे बोरे जवळच असलेल्या झाडाझुडपात फेकून स्पष्ट दिसत आहे. संबंधित विभागाची चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी ज्यावेळी परिसराची पाहणी केली, त्यावेळी दोन घरात लपवून ठेवलेलं साहित्य झुडपात आढळलं आहे.
अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष शहानिशा केली
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष शहानिशा केली, त्यावेळी बाजूच्या दोन घरी लपवून ठेवलेले साहित्य आढळले. काहीवेळेला आहाराचं साहित्य निकृष्ट दर्जाचे येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. एकिकडे बालकांच्या पोषण आहारातील धान्य निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे बालकांच्या या आहारावर डल्ला मारला जातोय अशी स्थिती आहे.
नागपूर जिल्ह्याच्या येरखेडा येथे अंगणवाडीतील सेविकांची चौकशी…
राज्यभरातील अंगणवाडीत सरकारकडून वेळोवेळी आहार पाठवला जातो. परंतु विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार हा अत्यंत कमी दर्जाचा असल्याच्या तक्रारी आतापर्यंत पालकांनी केल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने चांगला आहार मुलांना द्यावा अशी मागणी सुध्दा केली आहे. परंतु मिळत असलेला आहाराची परस्पर विक्री होत असल्याचे प्रकरण उजेडात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. नागपूर जिल्ह्याच्या येरखेडा येथे अंगणवाडीतील सेविकांची चौकशी करण्यात येणार आहे, त्याचबरोबर दोषी असणाऱ्या सेविकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील संपुर्ण अंगणवाडीची तपासणी करण्याचं आवाहन नागरिकांनी केलं आहे. त्यामुळे मुलांचा आहार इतरत्र जात असल्याची अनेक प्रकरण उजेडात येतील.