भाजपमध्ये संघाची घराणेशाही, तिथं संघाच्या विचाराचा माणूस वर जातो, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
इथे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. संघात त्यांच्याच विचाराचा माणूस वरपर्यंत जातो. मोदीजींनी जो आरोप केलाय, तो संघाच्या घराणेशाहीवर केलाय, काँग्रेसवर नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.
नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आधी नागपूरमधून चालायची ,आता दिल्लीतून चालतेय. तो फरक आता जाणवायला लागलाय. भाजपमध्ये आज आरएसएसची घराणेशाही आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. इथे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. संघात त्यांच्याच विचाराचा माणूस वरपर्यंत जातो. मोदीजींनी जो आरोप केलाय, तो संघाच्या घराणेशाहीवर केलाय, काँग्रेसवर नाही, असा टोला पटोले यांनी लगावला. भाजपमध्ये संघाची घराणेशारी चाललीय ती घराणेशाही नाही? का असा सवाल देखील नाना पटोले यांनी केला.
हिंदू विचाराची लोक सत्तेत असूनही गंगेत प्रेत वाहत होती
कोरोनात केंद्रात हिंदू विचाराचे लोक सत्तेत असूनंही गंगा नदीत हिंदूते प्रेत वाहत होते. विटंबना होत होती. हिंदू मरत होते, याची आठवण नाना पटोले यांनी करुन दिली आहे. हा देश संविधानाला मानणारा आहे, काँग्रेस संविधानाच्या विचाराने चालली आहे. मी स्वत: हिंदू आहे. या देशाच्या लोकशाहीत सर्व धर्माला घेऊन चालावं लागतं, असं नाना पटोले म्हणाले. काही लोक या व्यवस्थेला मक्तेदारी म्हणून चालत असेल तर ती मक्तेदारी होऊ शकत नाही, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस स्वबळावर लढणार, विधान परिषद बिनविरोध करण्याची चर्चा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी प्रक्रिया सुरु झालीय. हा आमच्या स्ट्रॅटेजीचा प्लान आहे, असंही नाना पटोले म्हणाले. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याबाबत प्रस्ताव आलाय. त्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. तीन वाजेपर्यंत स्पष्टीकरण पुढे येईल. मुंबई, कोल्हापूर, नागपूर, धुळे नंदूरबारची जागा बिनविरोध करण्यासाठी चर्चा सुरु आहे. निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असून मार्ग निघेल, असंही नाना पटोले म्हणाले.
भाजपनं एसटी आंदोलनाला फूस लावली
नाना पटोले यांनी भाजपने फुस लावलेलं एसटीचं आंदोलन सुरु आहे आहे. चर्चेतून मार्ग काढला जाईल. काँग्रेस एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहे. भाजप देशात खाजगीकरण करायला निघालंय. काँग्रेस एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहे.
इतर बातम्या:
देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना डावललं त्यांना पुन्हा संधी; भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?
Nana Patole gave answer to Narendra Modi and accused BJP have Dynastic Politics