व्हॉट्सअप चॅटचा पाकिस्तानशी संबंध काय?; एनआयएच्या छापेमारीत काय घडलं?

या भागातील लोकांनी असं काय केलं, असा त्यांना प्रश्न पडला. आजूबाजूचे लोकं जमा झाले. एकमेकांना विचारपूस करू लागले. त्यानंतर वेगळंच कारण समोर आलं.

व्हॉट्सअप चॅटचा पाकिस्तानशी संबंध काय?; एनआयएच्या छापेमारीत काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 12:21 PM

नागपूर : नागपुरात आज सकाळी एनआयएची टीम पोहचली. सकाळी-सकाळी छापेमारी सुरू झाली. नेमकं काय घडलं हे कळायला काही मार्ग नव्हता. सतरंजीपुरा परिसर हादरला. या भागातील लोकांनी असं काय केलं, असा त्यांना प्रश्न पडला. आजूबाजूचे लोकं जमा झाले. एकमेकांना विचारपूस करू लागले. त्यानंतर वेगळंच कारण समोर आलं. इथल्या काही जणांनी व्हॉट्सअपवरून संशयास्पद चॅट केलं. त्यावरून ही छापेमारी करण्यात आली. हे व्हॉट्सअप चॅट हे पाकिस्तानशी संबंधित असल्याने खळबळ माजली.

या संघटनेच्या लोकांवर छापेमारी

नागपुरात तीन ठिकाणी NIA ची छापेमारी केली. प्रतिबंधित संघटन जाकिर नाइकचे संगटन इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरएफ) शी संबंधित लोकांवर छापेमारीची माहिती आहे. वेगवेगळ्या सीमच्या माध्यमातून पाकिस्तानात संशयास्पद व्हॅाट्सॲप चॅटिंग केल्याची माहिती आहे.

NIA N 1

हे सुद्धा वाचा

यांची करण्यात आली चौकशी

नागपुरातल्या सतरंजीपुरा भागात NIA चा छापा मारला. पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हॉट्सअपवरून संशयास्पद चॅट केल्याप्रकरणी चौकशी केली. अख्तर रजा वल्द मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा वल्द मोहम्मद मुक्तार यांची चौकशी केल्याची माहिती आहे.

काही सीमकार्ड ताब्यात घेतल्याची माहिती

आज पहाटे 4 वाजता NIA ची टीम सतरंजीपुरा भागात पोहचली. NIA च्या छाप्याने नागपुरात खळबळ उडाली. NIA टीम चौकशी करून परतली. अद्याप कुणाला ताब्यात घेतलं नाही. NIA टीमकडून काही सीम कार्ड ताब्यात घेण्यात आले.

संशयावरून चौकशी

सीमकार्डची तपासणी केल्यानंतर खरोखरचं काय चॅट्स करण्यात आले. यातून काय करायचे होते, याचा तपास चमू करेल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. परंतु, अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नाही. संशयावरून ही चौकशी करण्यात आली आहे.

या संघटनेशी संबंधित लोकांची चौकशी

संघटन जाकिर नाइकचे संघटन इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरएफ) ही संघटना प्रतिबंधित आहे. या संघटनेची संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली. पोलिसांना संशय आहे की, यांनी पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संशयास्पद चॅटिंग केली. त्यामुळे ही चौकशी करण्यात आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.