नितेश राणे का उसमे कोई भी योगदान नही है, सिंधुदुर्गातल्या राड्यावर राणेंचं वक्व्य, नितेश अज्ञातवासात?

कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? नितेश राणेनं कुछ भी हरकती किये नही है. हे सर्व आरोप सूडाच्या भावनेतून केले जात आहेत, असा पलटवार केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

नितेश राणे का उसमे कोई भी योगदान नही है, सिंधुदुर्गातल्या राड्यावर राणेंचं वक्व्य, नितेश अज्ञातवासात?
narayan rane
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 10:33 AM

नागपूर: कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? नितेश राणेनं कुछ भी हरकती किये नही है. हे सर्व आरोप सूडाच्या भावनेतून केले जात आहेत, असा पलटवार केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्गात झालेल्या राड्यात नितेश राणें का उसमे कोई भी योगदान नही है, असंही राणेंनी सांगितलं.

नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे उत्तर दिलं आहे. कसल्या अटके बद्दल? काय केलं नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल म्हणून सूडाच्या भावनेतून कारवाई होऊ शकते. केस टाकली की अटक होणार हे काही माहीत नाही, असं राणेंनी सांगितलं.

नितेश अज्ञातवासात नाहीत

नितेश राणे अज्ञातवासात आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर नितेश राणे अज्ञातवासात नाहीये. सिंधुदुर्गातच आहेत. ते आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोर्टात जावं लागेल

आमच्यावर सूडाच्या भावनेने आरोप केले जात असतील तर कोर्टात तर जावं लागणार. अशा रितीने बातम्या येत असतील तर कोर्टात जावं लागेल. सरकारला काय करायचं ते करू द्या. नितेश राणेंनी काहीही केलं नाही. त्यांनी कोणाला मारलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी आरक्षणाबाबत बोलणं घाईचं होईल

ओबीसींचं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणही जाऊ शकते अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत विचारलं असता या संबंधी भविष्यवाणी वर्तवणं चुकीचं होईल. जो निर्णय होईल तो ऐकल्यावर मत व्यक्त करणं योग्य होईल, असं त्यांनी सांगितलं. सुक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून विदर्भाला भरपूर काही द्यायचं आहे. ते देण्यात येईल, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

एक रेल्वे गार्ड, एक फोटो, अन् जगलाल यांना काळजाचा तुकडा मिळाला; मनमाड स्टेशनवर मुलीच्या अपहरणाचा कट उधळला

Corona Vaccine for Child : कॉलेजला या लस घ्या, मुंबई महापालिकेचा 9 लाख मुलांच्या लसीकरणासाठी मेगा प्लॅन

Vastu Tips : नवीन वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी ‘या’ 5 वास्तु टिप्स फॉलो करा आणि आयुष्य बदला!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.