नितीन गडकरींनी दिले मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत संकेत, नागपुरातील अनेक नगरसेवक धास्तावले!

तुम्हाला तिकीट मिळणार की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण मी तिकीट देत नाही. मी सर्व्ह करतो ज्याला जनता म्हणेल त्याला तिकीट दिली जाते, असंही त्यांनी सांगितलं.

नितीन गडकरींनी दिले मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत संकेत, नागपुरातील अनेक नगरसेवक धास्तावले!
नागपुरात मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 3:09 PM

नागपूर : नगरसेवकांचा आज महापालिकेतील (Municipal Corporation) शेवटचा दिवस आहे. मात्र पुन्हा आपल्याला यायचं आहे. राजनीती बुलेट ट्रेनप्रमाणे (Bullet Train) आहे. लोकांची गर्दी होते आणि ती खाली होते पुन्हा भरते. हेच लोक पुन्हा निवडून आले तर जे आमच्या घरी चकरा मारत आहे त्यांचं काय होणार? त्यांना तिकीट कसं मिळणार, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणाले. पण सगळ्यांनी चांगलं काम केलं. त्यांना शुभेच्छा. मी लोकसभेत बोलताना उभं होतो. तेव्हा सगळ्या पार्टीचे लोकं मला अभिनंदन करतात. मी त्यांना गमतीत म्हणतो. माझी श्रद्धांजली सभा आहे का? तुमचं काम चांगलं असेल तर सगळे तुमच्या सोबत असतात.

नगरसेवकांचं काम सगळ्यात कठीण

नगरसेवकांचा काम सगळ्यात कठीण असते. कारण प्रत्येक जण आपलं काम त्यांच्याकडे घेऊन जातात. सगळ्यांनी केलेल्या कामाला शुभेच्छा देतो. देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला पुन्हा तिकीट मिळो. सत्यनारायण नुवाल यांनी खूप मोठं काम देशासाठी केलं. नागपूरची मेट्रो जगातील उदाहरण देणारी मेट्रो आहे. पुण्यात सुद्धा चांगली मेट्रो उभारण्यात आली. शहर बस सेवा मेट्रोने चालवावी असा प्रयत्न सुरू आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.

हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं स्वप्न

हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं माझं स्वप्न आहे. त्याची तयारी सुरू करा मी त्यासाठी पैसे आणतो. त्याचं मंत्रालय माझ्याकडे आहे, असंही गडकरी म्हणाले. मला एका पत्रकाराने विचारलं सरकारमध्ये चांगले काम कोणते आणि वाईट काम कोणते, यावर मी सांगितलं. सरकारमध्ये चांगल्या कामाला सन्मान मिळत नाही. आणि वाईट काम करणाऱ्याला सजा मिळत नाही. इथे सगळे बरोबरच असते. तुम्हाला तिकीट मिळणार की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण मी तिकीट देत नाही. मी सर्व्ह करतो ज्याला जनता म्हणेल त्याला तिकीट दिली जाते, असंही त्यांनी सांगितलं.

अमरावती महापालिकेवर 8 मार्चपासून प्रशासकाची सत्ता, निवडणूक लांबणीवर, कारण काय?

शेतकऱ्यांच्या धान खरेदीस मुदतवाढ मिळण्याची शक्यता; भुजबळांनी काय दिले संकेत?

Video – भंडाऱ्याच्या शिवसेना आमदारांची नितीन गडकरींना साद, भाजप-शिवसेना युतीचे जुने दिवस येतील का?

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....