अंबाझरी ते गोसेखुर्द होणार पाण्यातून प्रवास?; नितीन गडकरी यांचं आणखी एक स्वप्न

या लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्याला एंट्री देऊ नका. कारण आमच्या प्रभागात तीर्थलंकार मंडळींची बरीच मेजारिटी आहे. विरंगुळा ज्येष्ठ नागरिकांचाही झाला पाहिजे.

अंबाझरी ते गोसेखुर्द होणार पाण्यातून प्रवास?; नितीन गडकरी यांचं आणखी एक स्वप्न
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 3:45 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ई लायब्ररीचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, या लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्याला एंट्री देऊ नका. कारण आमच्या प्रभागात तीर्थलंकार मंडळींची बरीच मेजारिटी आहे. विरंगुळा ज्येष्ठ नागरिकांचाही झाला पाहिजे. मुलांना अभ्यासही करता आला पाहिजे. नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने हशा पिकला.

पण, हा दोन किमीचा रस्ता बांधू शकलो नाही

नागपूर शहराला दूषित पाणी, कचऱ्यापासून मुक्त करायचं आहे. 40 हजार दिव्यांगांना साहित्य देऊन मदत केली. मी दिल्ली-मुंबई हा महामार्ग 1 लाख कोटी खर्च करून बांधला. पण मी केळीबाग रोडवरील 2 किलोमीटरचा एक रस्ता बांधू शकलो नाही. जेवढ्या खुट्या टाकायच्या आहे तेवढ्या टाकण्याचं काम झालं, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

कचऱ्याची लागणार विल्हेवाट

सात-आठ टाक्या पूर्ण झाल्यास शहरात २४ तास पाणी मिळेल. २४ शे कोटी रुपयांची नाग नदीची योजना राबविलं. या कामालाही सुरुवात झाली आहे. कचऱ्याची समस्या होती. जल, वायू प्रदूषणातून मुक्ती दिली पाहिजे. लिगसी कचरा १८ लाख टन आहे. याचे डिस्पोजल करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. तो कचरा आता एलअँडटीला पोहचवतो आहोत.

दिल्लीचा २० लाख टन कचरा दिल्लीतील रस्त्यांमध्ये टाकला. अहमदाबादचा २० लाख टन कचरा रस्त्यात टाकला. आता नागपुरातही कचऱ्याची विल्हेवाट लावणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

महालात राहायला येणार आहे

महालात राहायला येणार आहे. शहर बदलत आहे. बुधवार बाजारात मोठी बिल्डिंग बनत आहे. नंदाजीनगर चांगला झाला पाहिजे. मुलं शिकले पाहिजे. ज्येष्ठांना फिरायला चांगला बगिचा झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी १५ शे कोटी रुपये नागपूर शहराच्या विकासासाठी दिले.

कमी जागेत चांगले वाचनालय

झोपडपट्टीतील लोकांसाठी कमी जागेत सुंदर बिल्डिंग बांधली आहे. शाहू महाराज यांच्या नावाने ही लायब्ररी आहे. सुरेश भट सभागृह हे देशातल्या चांगल्या सभागृहांपैकी एक आहे. त्यावर सोलर लावण्यात आलं आहे. त्यामुळे विजेचं बील येत नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.