Good Governance Day | नितीन गडकरी म्हणाले, सुशासन अटलजींचं स्वप्न, ते आपल्याला पूर्ण करायचंय
नितीन गडकरी म्हणाले, अनेक कार्यकर्त्यांना अटलजींचा सहवास मिळाला. आता त्यापैकी काही कार्यकर्ते आपल्यामध्ये नाहीत. महाराष्ट्रात अटलजींचा दौरा झाला होता तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. अटलजींना मराठी नाटक खूप आवडायचं.
नागपूर : माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांचं देशात सुशासन प्रस्तापित करण्याचं स्वप्न होतं. ते आपल्याला पूर्ण करायचं, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज व्यक्त केलं. सुशासन दिनानिमित्त (Good Governance Day) कार्यक्रमात ते नागपुरात आज बोलत होते.
घरी आलेल्या प्रत्येकाला अटलजी भेटत
नितीन गडकरी म्हणाले, अनेक कार्यकर्त्यांना अटलजींचा सहवास मिळाला. आता त्यापैकी काही कार्यकर्ते आपल्यामध्ये नाहीत. महाराष्ट्रात अटलजींचा दौरा झाला होता तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. अटलजींना मराठी नाटक खूप आवडायचं. हिंदी साहित्यावर त्यांचं अतूट प्रेम होतं. अविस्मरनीय व्यक्तिमत्वाची आजही आठवण केली जात आहे. अटलजी घरी आलेल्या प्रत्येकाला भेटत असत.
अटलजींचं स्वप्न पूर्ण करायचंय
नितीन गडकरी यांनी अटल विहारी वाजपेयींबद्दल सांगितले की, संघ आणि भाजपबद्दल त्यांच प्रेम होतं. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविणे हे त्यांचं ध्येय होतं. कारगिलला टनल बनविलं तेव्हा मला अटलजींची आठवण झाली. कारण त्याच जागेवर पाकिस्तानने कब्जा केला होता. कारगिल युद्ध आपण जिंकलो त्या टनलला अटलजींचं नाव देण्यात आलं. अटलजींच्या जयंती निमित्ताने सुशासन दिन आपण पाळतो. सुशासन हे अटलजींच स्वप्न होतं. ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम अनेकांच्या जीवनावर झाला. तसाच तो माझ्याही जीवनावर झाल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं.