नितीन गडकरींचा बुलेटप्रुफ गाडीला रामराम; आता फक्त इलेक्ट्रिक कारने प्रवास

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे. | Nitin Gadkari electric car

नितीन गडकरींचा बुलेटप्रुफ गाडीला रामराम; आता फक्त इलेक्ट्रिक कारने प्रवास
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन वाहनांचं प्रमाण कमी करणे गरजेचं आहे. याला पर्याय म्हणुन इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितलं जातंय. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 9:20 AM

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरात प्रवास करताना आपल्या बुलेटप्रूफ गाडी रामराम केलाय. नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी इंधनाच्या कार वापरणार नाही, असं म्हणत नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक कार (Electric car) वापरायला सुरुवात केलीय. (Nitin Gadkari using electric car for travelling in Nagpur)

गडकरी जेव्हा नागपुरात असतील तेव्हा तेव्हा ते पांरपारिक इंधनावर चालणाऱ्या कारऐवजी इलेक्ट्रिक कार वापरतात. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन वाहनांचं प्रमाण कमी करणे गरजेचं आहे. याला पर्याय म्हणुन इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितलं जातंय. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे.

भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावं. त्याचाच एक भाग म्हणून बुलेटप्रुफ गाडी सोडून नागपुरात इलेक्ट्रिक गाडी वापरत असल्याचे नितीन गडकरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

नव्या कार खरेदीवर मिळणार 5 टक्के डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आखलेल्या व्हेईकल स्क्रॅप्रिंग धोरणामुळे (Vehicle Scrapping Policy) ग्राहकांना एक मोठा फायदा होणार आहे. या धोरणानुसार तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात देऊन नवी गाडी खरेदी केली तर तुम्हाला नव्या कारच्या खरेदीवर 5 टक्के सूट (Car discount) मिळेल. केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. (Vehicle Scrappage Policy Replace the old car with a new one, Special discount from government)

नितीन गडकरी यांच्या या घोषणेनुसार ग्राहकाने जुनी कार स्क्रॅप केल्यास वाहन कंपनीकडून संबंधित ग्राहकाला कार खरेदीवेळी पाच टक्क्यांची सूट (Rebate from automakers) मिळेल. त्यामुळे जुन्या गाड्या असलेल्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पावेळी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 20 वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांसाठी फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे. तर व्यावसायिक वाहनांसाठी ही कालमर्यादा 15 वर्षे इतकी आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी सध्या ऐच्छिक आहे.

संबंधित बातम्या:

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त, एक युनिट चार्जिंगवर ‘इतके’ किलोमीटर धावेल इलेक्ट्रिक कार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Nitin Gadkari using electric car for travelling in Nagpur)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.