Nitin Gadkari : नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क, नितीन गडकरी यांची घोषणा

शिबिरामध्ये केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली.

Nitin Gadkari : नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क, नितीन गडकरी यांची घोषणा
नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्कImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:02 AM

नागपूर : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क नागपूर शहरामध्ये साकारण्याले जाईल, अशी घोषणा केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी संयुक्तरित्या केली. भारत सरकारच्या (Government of India) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास (Skill Development Rehabilitation) एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने दक्षिण नागपुरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने रेशीमबाग मैदानात (Reshimbag Maidan) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते साहित्य वितरणाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर

डॉ. वीरेंद्र कुमार यांनी नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित सहाय्यक साधने वितरीत करण्यासाठीचे हे शिबिर देशातील सर्वात मोठे असल्याचे उद्गार काढीत गौरव केला. त्यांनी केंद्र शासनाच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती दिली. राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) अंतर्गत अनेकांच्या जीवनात आनंद फुलल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 27 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील 35,136 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना 35 कोटी रुपये किंमतीची 2,34,781 उपकरणे वितरीत केले जाणार आहेत. याअंतर्गत गुरूवारी दक्षिण नागपुरातील 9018 लाभार्थ्यांना (अडीप – 854, वयोश्री- 8164) एकूण 67,683 रुपये 9.19 कोटी किंमतीची साहित्य, उपकरणे (अडीप- 1731, वयोश्री- 66952) वितरित करण्यात आले. याप्रसंगी उत्तमरित्या शिबीर आयोजित करण्यासाठी श्री. गडकरी आणि डॉ.वीरेन्द्र कुमार यांनी नरेन्द्र (बाल्या) बोरकर यांचा सत्कार केला.

प्रातिनिधीक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली. यावेळी संदीप राम भगत यांना मोटराईज्ड ट्रायसिकल, भरत बाबुराव निमजे यांना ट्रायसिकल, चंदन बाबु लाल यांना व्हिलचेअर, सहादेव श्रीपत राउत यांना चष्मा, चंद्रभान पारवे यांना कृत्रिम दात, संतोष निताई दास यांना कृत्रिम पाय, विशाल कैलाश यांना स्मार्ट फोन, कविता विजय मती यांना सुगम्य केन, भागवत सदाशिव यांना कानाची मशीन आणि नर्मदा आत्माराम यांना कमोडसह व्हिलचेअर वितरीत करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे

वॉकिंग स्टिक श्रवण यंत्र एल्बो कक्रचेस व्हीलचेअर ट्रायपॉड्स क्वॅडपॉड कृत्रिम मर्डेचर्स स्पेक्टल्स क्वॅकपॉड स्पेक्टल्स

एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे

वॉकिंग स्टिक एल्बो कक्रचेस एझलरी कक्रचेस (कुबडे) कृत्रिम अवयव श्रवण यंत्र ट्रायपॉड्स क्वैडपोड व्हीलचेयर ट्रायसिकल (मॅन्युअल) ट्रायसिकल (बॅटरी) कॅलीपस TLM कीट ब्रेल कीट (दृष्टीहिन करिता) स्मार्ट फोन (दृष्टीहिन करिता) डेजी प्लेयर (दृष्टीहिन करिता) स्मार्ट केन (दृष्टीहिन करिता)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.