“ओबीसींना भाजपवाले दूधखुळं बाळ समजतात”; काँग्रेसनं भाजपला राहुल गांधी प्रकरणावरून सुनावलं…

या देशातील अस्थिरता संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. जेल भरो करू, रॅली काढू त्या दृष्टीने आमचा वर्षभराच्या आंदोलनाचा प्लॅन सुरू आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसींना भाजपवाले दूधखुळं बाळ समजतात;  काँग्रेसनं भाजपला राहुल गांधी प्रकरणावरून सुनावलं...
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 5:28 PM

नागपूर : काँग्रेसचे राहुल गांधी यांची खासदारकी, रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला जात आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा आरोपही भाजपने करून राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन पुकारले आले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आता आमनेसामने आली आहे. यावरूनच आता काँग्रेसचे माजी मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी ओबीसीच्या मुद्यावरून भाजपवर सडकून टीका केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ओबीसींना भाजपवाले दूधखुळं बाळ समजत आहेत. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे आता हे ओबीसीचं नव कार्ड खेळत असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाचं कार्ड भाजप खेळत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

नीरव आणि ललित मोदी यांना चोर म्हणणं हा अपमान आहे का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्यावर टीका करायची नाही तर आपण काय नीरव आणि ललित मोदी यांच्यासारख्या लोकांची पूजा करायची का त्यांना ओबीसी चे नेते म्हणायचं का? हे एकदा भाजपनेच ठरवावे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ज्यांना चोर म्हटलं त्यांना कोणता जात आणि पंत असतो का? कारण ज्यांनी देश लुटला आहे आणि आता तर ओबीसींचा अपमान केला म्हणणार यांची कीव येते असंही म्हणत त्यांनी भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडून ओबीसींची अस्मिता धुळीत मिळविण्यासाठीच भाजप आंदोलन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली

राहुल गांधी कशासाठी माफी मागतील ज्यांच्या आईने, आजीने देशासाठी आपलं रक्त सांडवलं आहे. त्यांनी काय चूक केली आहे की ज्याच्या बदल्यात त्यांनी माफी मागावी लागणार असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.

या देशांमध्ये कोणाच्या विरोधात बोलणं चूक आहे का आणि तेही ज्यांनी देशाला फसवलं आहे, ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांच्यावरही टीका करायची नाही का असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

एखाद्या आडनावाच्या माणसाच्या नावामध्ये साम्य असेल तर त्यात कसला आला आहे अपमान. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची जी लोकप्रियता वाढली आहे.

त्यामुळे हे घाबरले आहेत आणि त्यांनी राहुल गांधींचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे पार्लमेंट मध्ये आवाज बंद करा मात्र लोकांच्या मनातून कसा काढणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांच्या रोषाला कसं समोर जाणार भाजपला याचा प्रायचित्त करावे लागणार आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राहुल गांधी आणि लोकशाहीला भाजपमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा ठरत आहे आणि हे एक दिवसाच नाही तर वर्षभर आंदोलन करत राहणार असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

या देशातील अस्थिरता संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. जेल भरो करू, रॅली काढू त्या दृष्टीने आमचा वर्षभराच्या आंदोलनाचा प्लॅन सुरू आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.