‘त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल, पण नॉन क्रिमीलेअर होणार नाही’, ओबीसी नेत्याचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेच्या मागणीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रतिज्ञापत्राच्या आधारावर ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. याचबाबत बबनराव तायवाडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल, पण नॉन क्रिमीलेअर होणार नाही', ओबीसी नेत्याचं मोठं वक्तव्य
जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 7:58 PM

सुनील ढगे, Tv9 मराठी, नागपूर | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहेत. ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत त्यांच्या सगेसोयरेंना प्रतिज्ञापत्राच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र वाटप केलं जावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी याबाबतच्या मागणीसाठी सरकारला आज रात्री आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने ही मागणी मान्य केली तर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. मराठा समाजाच्या नागरिकांच्या आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 37 लाख जणांना ओबीसी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आहे, असं सरकारने सांगितलं आहे. आता सगेसोयरेंना प्रतिज्ञापत्रांच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली तर मराठा समाजाच्या मोठ्या जनसमुदायाला थेट ओबीसी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.

“मनोज जरांगे यांनी मागणी केली की ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या नातेवाईकांच्या नोंदी नसतील तर प्रतिज्ञापत्र देऊन प्रमाणपत्र दिलं जावं. असं ते म्हणत असले तरी त्याचा फायदा होणार नाही. त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल. मात्र त्यांचं नॉन क्रिमीलेअर होऊ शकत नाही. कारण त्यासाठी वंशावळी असावी लागते. ते त्यांच्याकडे मिळणार नाही. त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही”, असा मोठा दावा बबनराव तायवाडे यांनी केला.

‘ते’ राज्य सरकारच्या हातात नाही, बबनराव तायवाडे यांचा दावा

“मनोज जरांगे म्हणतात 37 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले आहेत, आणि त्यांच्याकडे यादी आहे, तर त्या यादीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. माझ्या मते ज्या काही 54 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 99 टक्के जुन्याच नोंदी आहेत. सगेसोयरे संदर्भात निर्णय घेणे हे राज्य सरकारच्या हातात नाही, आपली पितृसत्ताक असल्याने वडिलांची जात मुलांना लागते, आईकडची जात लागत नाही. जे सर्व जीआर जरांगे मागत आहे, ते सर्व जुनेच नियम आहेत. 12 वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहेच, त्या पुढच्या शिक्षणासाठीही मदत मिळते”, असं बबनराव तायवाडे म्हणाले.

“मनोज जरांगे यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रभरात आंदोलन समाप्त होईल अशी अपेक्षा आहे”, असं बबनराव तायवाडे म्हणाले. तसेच “सध्याच्या घडामोडींवरून आम्ही सरकार आणि जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत”, अशी प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.