Nagpur Omicron | ओमिक्रॉन धडकला; धडधड वाढली, परदेशातून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर मनपा आयुक्तांनी ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटची माहिती दिली. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून दिल्लीवरून नागपुरात पोहचला. सहा डिसेंबर रोजी विमानतळावर पॉझिटिव्ह सापडला होता.
नागपूर : नागपुरात जिनोम सिक्वेंसिंगमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाचं निदान झालंय. या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. चार डिसेंबर रोजी बुर्कनाफासो येथून रुग्ण नागपुरात आला. विमानतळावर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवलं होतं.
40 वर्षाचा व्यक्ती निघाला पॉझिटिव्ह
नागपूर महाराष्ट्रातील पाचवं ठिकाण आहे जिथं कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पोहचला. यापूर्वी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि कल्याण-डोंबवलीत कोरोनाचे रुग्ण सापडले. राज्यात कोरोना व्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पाय पसरवत आहे. नागपुरात आता ओमिक्रॉनचा बाधित रुग्ण समोर आलाय. 40 वर्षांचा कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडला. त्यामुळं राज्यात ओमिक्रॉनच्या संक्रमित रुग्णांची संख्या 18 झाली आहे. नागपूर मनपा आयुक्तांनी ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटची माहिती दिली. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून दिल्लीवरून नागपुरात पोहचला. सहा डिसेंबर रोजी विमानतळावर पॉझिटिव्ह सापडला होता. सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.
शनिवारी राज्यात सापडला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण
शनिवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला. रविवारी आणखी काही रुग्ण सापडले. आता ओमिक्रॉन रुग्णांची संख्या राज्यात 18 झाली आहे. त्यापैकी 7 रुग्ण शुक्रवारी बरे झाले. त्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. आता राज्यात ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या 11 झाली आहे. आतापर्यंत मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुण्यात 1 आणि 1 रुग्ण कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सापडला. रविवारी नागपुरातही एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला.
59 देशांत ओमिक्रॉनची धडक
आतापर्यंत ओमिक्रॉन 59 देशांमध्ये पोहचला आहे. महाराष्ट्राशिवाय दिल्ली, चंदीगड, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातही ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण सापडले. देशभरात 37 रुग्ण ओमिक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झालेत. परंतु, आतापर्यंत देशात ओमिक्रॉन व्हॅरिएंटनं एकाचाही बळी गेलेला नाही. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही.