Nagpur Crime | आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन, नेमकं काय घडलं?

नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्मघातकी पाऊल उचलले. आई रागावली म्हणून तिने विष पिऊन आत्महत्या ( student ends her life) केली. त्यामुळं त्यांच्या घरी दुःखाचे सावट पसरले.

Nagpur Crime | आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन, नेमकं काय घडलं?
तहसील पोलीस.
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:14 PM

नागपूर : अल्तिया ही मोमीनपुऱ्यात राहणारी पंधरा वर्षांची विद्यार्थिनी. दहाव्या वर्गात शिकत होती. चौदा फेब्रुवारीला अल्तिया शाळेतून घरी आली. अभ्यास करत नव्हती म्हणून तिची आई तिला (angry mother) रागावली. दोघांचाही वाद झाला. हे बोलणं तीनं मनावर घेतलं. आईचं नेहमीचं बोलणं ऐकूण तिला त्रस्त झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळं तीनं सायंकाळी विष (Poison taken ) घेतले. त्यामुळं तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारादरम्यान गुरुवारी अल्तियाचा मृत्यू झाला. तहसील पोलिसांनी (Tehsil Police) आकस्मित मृत्यूची नोंद केली. ही मुलगी वयात आली होती. किशोरावस्थेमुळं मुलांच्या शरीरात बरेच बदल होत असतात. त्यामुळं अशावेळी मुलांशी वागताना खूप सांभाळून बोलावे लागते. त्यांना मित्राप्रमाणे वागवावे लागते. अन्यथा ही मुलं घातक पाऊल उचलू शकतात.

नगरसेविकेच्या दिराची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, रामेश्वरीतील सुपर बाजारचे संचालकांनी गुरुवारी सकाळी गळफास लावला. भगवाननगर येथील मनोहर महादेवराव बांते असं मृतकाचं नाव आहे. मनोहर हे भगवाननगर येथील हावरापेठ परिसरात राहत होते. ते माजी नगरसेवक शरद बांते यांचे मोठे भाऊ, तर नगरसेविका विशाखा बांते यांचे दिर होते. त्यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी शरद बांते यांच्या भाजीचे लग्न होते. त्यामुळे बांते कुटुंब लग्नाला खरबी येथे गेले होते.

घरचे लग्नात असताना मनोहर यांनी घेतला घातक निर्णय

शरद बांते यांचा मुलगा सुपर बाजारमध्ये गेला होता. तर मनोहर बांते अकरा वाजतापर्यंत विवाहस्थळी पोहोचणार होते. पण, ते लग्नाला न आल्याने बांते यांनी त्यांना फोन केला. परंतु, फोनवरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सुपर बाजारमधील एका कर्मचार्‍याला घरी पाठविले. यावेळी हा कर्मचारी घरी पोहोचल्यानंतर घराचे दार आतून बंद होते. त्यानंतर शरद बांते यांच्या मनात शंका वाढत गेली. ते घरी गेले. येथे पोहोचून घराचे दार तोडला. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना मनोहर हे गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Nagpur | माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य, जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, काय आहे ही स्पर्धा?

नागपुरातील सातपुडा वनस्पती उद्यानात बटरफ्लाय पार्क; योगा केंद्राव्यतिरिक्त काय असणार सुविधा?

बिबट्याने घेतला 16 वर्षीय मुलाचा घास, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुरात रात्री नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.