नागपुरातील गुन्हेगारी भागात पोलिसांनी लावले क्यूआर कोड, गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नवी युक्ती

अधिक गुन्हेगारी घडत असलेल्या भागात पोलिसांचा वावर वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. नागपूर शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत.

नागपुरातील गुन्हेगारी भागात पोलिसांनी लावले क्यूआर कोड, गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नवी युक्ती
नागपुरातील गुन्हेगारी भागात पोलिसांनी लावले क्यूआर कोड
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 9:30 PM

नागपूर : नागपुरात वाढलेल्या गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी आता पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत कंबर कसली आहे. नियमित गुन्हेगारी घडणाऱ्या भागात पोलिसांनी क्यूआर कोड लावले असून त्या भागातील चार्ली आणि बिट मार्शलला त्या भागात जाऊन पंचिंग करावी लागणार आहे. शहरातील 1500 ठिकाणी हे क्यूआर लावण्यात आले आहेत आणि पोलिसांना नेमून दिलेल्या परिसरात जाऊन क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. (Police put up QR codes in criminal areas in Nagpur)

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा नवीन प्लान

अधिक गुन्हेगारी घडत असलेल्या भागात पोलिसांचा वावर वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. नागपूर शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत. यांना दिलेल्या परिसरात सतत पेट्रोलिंग करून गुन्हेगारीवर नजर ठेवण्याबरोबरच गुन्हेगारी संपविण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेकदा काही भागात पोलीस पोहचतच नाही आणि गुन्हा घडला की पोलीस जातात. मात्र गुन्हा घडूच नये यासाठी पोलिसांनी नवीन उपाययोजना केली आहे. शहरातील 1500 ठिकाण अशी निवडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी गुन्हे घडतात. मग ते महिला छेडछाड असो की चोरी किंवा हत्या या सगळ्या ठिकाणी एक पोलिसांचा एक क्यूआर कोड लागलेला असेल.

त्या त्या परिसरात जाऊन क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल

त्या ठिकाणी त्या परिसरातील बिट मार्शल आणि चार्लीला जाऊन त्याला स्कॅन करायचं आहे. त्यांनी तिथे स्कॅन करतातच ते त्या ठिकाणी पोहचले आहेत याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि कंट्रोल रूमला मिळणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार म्हणजे त्या पोलिसाला त्या परिसरात जावंच लागणार आणि सतत पोलिसांचा परिसरात वावरत असल्याने गुन्हेगारांवर त्याचा वचक तर राहीलच पण सोबतच पोलिसांच्या कामाचं मूल्यमापन सुद्धा होणार आहे. त्यामुळे पोलिसांना विश्वास आहे की याचा चांगला फायदा होणार आहे.

शहरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असते हे खरं आहे. मात्र अनेकदा ती कागदावर सुद्धा होते आणि परिसरात न पोहचताच हे चार्ली आणि बिट मार्शल कुठे तरी थांबतात. मात्र या यंत्रणेमुळे त्यांना ड्युटी दिलेल्या परिसरात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे पोलिसांचा वावर पाहून गुन्हेगारांवर वचक राहील हे निश्चित मात्र याचा किती फायदा होईल ते भविषातच कळेल. (Police put up QR codes in criminal areas in Nagpur)

इतर बातम्या

ना दागिने, ना पैसे, चोरट्यांनी चोरुन नेले चक्क खेकडे ! रत्नागिरीतील चित्रविचित्र चोरी, चर्चांना उधाण

Pandharpur Corona : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा, येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करा, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.