Nagpur Crime | चंद्रपुरातील चोऱ्यांमध्ये पोलिसांनी हेरलं, त्यानं नागपूर गाठलं; दिवसा रेकी रात्री घरफोडी, अखेर पोलिसांच्या जाळ्यात

नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी कुख्यात अश्या 29 घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय. त्यानं नागपूरच नाही तर चंद्रपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात सुद्धा घरफोड्या केल्या. मात्र आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.

Nagpur Crime | चंद्रपुरातील चोऱ्यांमध्ये पोलिसांनी हेरलं, त्यानं नागपूर गाठलं; दिवसा रेकी रात्री घरफोडी, अखेर पोलिसांच्या जाळ्यात
मानकापूर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 2:46 PM

नागपूर : पोलिसांच्या कब्जात असलेला आरोपी कुख्यात आहे. नीलेश पुरुषोत्तमवार (Nilesh Purushottamwar) असं याचं नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. याने नागपूरच्या मानकापूर परिसरात (Mankapur premises) चोरीचा धुमाकूळ घालत 10 घरफोड्या केल्या. चंद्रपूर जिल्ह्यात 19 घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. नीलेशने चोरीची सुरवात चंद्रपूरपासून केली. त्या ठिकाणी 19 गुन्हे केल्याने तो पोलिसांच्या रडारवर (on police radar) आला होता. म्हणून त्याने आपला मोर्चा नागपूरकडे वळविला. तो नागपुरात भाड्याने घर घेऊन राहायचा. दिवसभर खाली असलेल्या घरांची रेकी करायचा. त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे का हे तपासायचा. रात्रीच्या वेळी जाऊन घरफोडी करायचा. शेवटी पोलिसांनी त्याला हेरलं. जेलमध्ये टाकलं.

घरफोडीचे साहित्य दुचाकीत

पोलिसांनी आरोपीकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह महागड्या वस्तू जप्त केल्या. त्याच्या दुचाकीमध्ये नेहमी घरफोडीचं साहित्य राहत असायचं ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलं. अशी माहिती मानकापूरच्या पीआय वैजंती मंडवधरे यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या करणारा हा आरोपी हे सगळे काम एकटाच करत होता की, याचे काही साथीदार आहेत. याचा तपास आता पोलीस करत आहे. आणखी याचे काय कारनामे पुढे येत ते पाहावं लागणार आहे.

अशी होती चोरीची पद्धत

नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी कुख्यात अश्या 29 घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय. त्यानं नागपूरच नाही तर चंद्रपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात सुद्धा घरफोड्या केल्या. मात्र आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. नीलेश चंद्रपूरचा रहिवासी. तिथं पोलिसांच्या नजरेत भरला. त्यामुळं त्यानं नागपूर गाठलं. इथं तो किरायानं राहत असे. रिकाम्या घर कोणत आहे, याचा दिवसा शोध घ्यायचा. रात्री चोरी करायचा. त्याठिकाणी काही धोका तर नाही, याची काळजी तो घेत असे. पण, शेवटी पोलिसांच्या रडारवर आला. त्यात तो अडकला. आता जेलची हवा खाल्ल्याशिवाय त्याच्यापुढं काही पर्याय नाही.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.