Nagpur IIM | आयआयएम कॅम्पसच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा; 132 एकरवर साकारलाय परिसर

या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला आहे. त्याद्वारे आपले ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले आहे.

Nagpur IIM | आयआयएम कॅम्पसच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा; 132 एकरवर साकारलाय परिसर
नागपुरातील आयआयएमच्या नव्या इमारत व परिसराचे उद्घाटन 8 मे रोजी होणार आहे. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 6:00 AM

नागपूर : इंडियन इन्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ( आयआयएम ) नव्या इमारत व परिसराचे उद्घाटन 8 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे 7 मे रोजी येणार आहेत. ते या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 132 एकर भूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) (आयआयएम) नागपूरचे कॅम्पस साकारले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सद्या 668 विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील करण्यात आली आहे. याठिकाणी 20 हायटेक क्लासरुप आणि 24 प्रशिक्षण केंद्रे तसेच 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे.

दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा पुतळा

या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला आहे. त्याद्वारे आपले ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले आहे. विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप व नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण 7 सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.

सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपती पोहचणार

8 मे रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपती याठिकाणी पोहचणार आहेत. त्यासाठी कार्यक्रमस्थळी सर्व निमंत्रितांनी 9 वाजता पोहोचणे आवश्यक आहे. 9 वाजतानंतर सर्व रस्ते बंद होतील. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी व या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आयआएम व्यवस्थापनाने केले आहे. यापूर्वी 23 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते या विस्तारीत कॅम्पसचे उद्घाटन होणार होते. दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता हा उद्घाटन सोहळा 8 मे रोजी होत आहे.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.