Nagpur elections | मनपा निवडणुकीत वाढणार अडचणी? भूमिपूजनाचे फोटो अपलोड; प्रत्यक्ष कामच नाही!

महापालिकेची निवडणूक जवळ येत असल्यानं सारे उभेच्छुक कामाला लागले आहेत. नगरसेवक केलेल्या कामाच्या भूमिपूजनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. तर प्रत्येक कामचं झाले नसल्याच्या नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळं अशा प्रतिक्रिया या संबंधितांना अडचणीच्या ठरू शकतात.

Nagpur elections | मनपा निवडणुकीत वाढणार अडचणी? भूमिपूजनाचे फोटो अपलोड; प्रत्यक्ष कामच नाही!
अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 11:33 AM

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) नगरसेवकांनी सोशल मीडियावर (Social media) भूमिपूजनाचे फोटो अपलोड करून नागरिकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. परंतु प्रत्यक्षात कामच झाले नाही. हे नागरिकांच्या लक्षात येत असल्याने नगरसेवकांवर त्यांचीच पोस्ट बूमरॅंग होताना दिसून येत आहे. नागरिक आता कामाबाबत नगरसेवकांच्या घरी किंवा जनसंपर्क कार्यालयात जात नाहीत. थेट पोस्टवर व्यक्त होऊन संतापाला वाट मोकळी करून देत आहेत. गेल्या वर्षभरात मनपातील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी भूमिपूजनाचा धडाका सुरू केला. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरी असतानाही काही नगरसेवकांनी कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विकास कामांचे भूमिपूजन केले. या भूमिपूजनाचे फोटो त्यांनी फेसबूक, इन्स्टाग्रामवर शेअर केले. घरी बसलेल्या नागरिकांनाही आकर्षित केले. याच लॉकडाऊनमुळे अबालवृद्धापर्यंत सारेच सोशल मीडिया साक्षर झाल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले.

नगरसेवकांच्या पोस्टवर नागरिकांचे संतप्त सवाल

ज्येष्ठ नागरिकही सोशल मिडियावर खाते सुरू करून नेमके काय चालले याचा आढावा घेताना दिसत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध हटविल्यानंतर नागरिक बाहेर आले. परंतु नगरसेवकांनी भूमिपूजनाचे फोटो टाकलेली कामे प्रत्यक्षात सुरूच झाली नाही किंवा कामच झाले नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. परिणामी आता नागरिकांनीच नगरसेवकांना त्यांच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया देणे सुरू केले. एवढेच नव्हे काही नागरिकांनी सोशल मीडियावर मोठे पाठबळ मिळत आहे. नगरसेवकांच्या पोस्टचे स्क्रिनशॉट काढून स्वतःच्या अकाऊंटवर अपलोड करून संतप्त प्रश्न विचारले. याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत मतपेटीवर होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी झालेल्या कामाचे फोटो कधीच अपलोड केले नाही. त्यामुळे सोशल मीडियातून नगरसेवक मूर्ख बनवित असल्याची भावना सोशल मिडिया वापरकर्त्यांत तयार झाल्याचे पारसे यांनी सांगितले.

भूमिपूजनाचे नव्हे केलेल्या कामाचे व्हिडीओ अपलोड करा

नागरिकच आता सोशल मीडियातून नगरसेवकांविरोधात एकत्र आल्याचे दिसून येत आहे. काही नगरसेवकांनी कोरोनाचे अपडेट आकडे टाकून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम सुरू केले. मुळात नगरसेवक व नागरिक यांच्यात दुतर्फी संवादाची गरज असताना ते दिसून येत नाही. महापालिका निवडणुकीसाठी अजून दीड दोन महिने वेळ आहे. या काळात नगरसेवकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामांचा उहापोह करण्याचे टाळल्यास नगरसेवकच तोंडघशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे चित्र आहे. सोशल मीडियावरून आता कुणालाही मूर्ख बनविता येत नाही. नगरसेवकांनी खरेच कामे केली असेल तर त्याचे फोटो नव्हे तर व्हिडीओ अपलोड केल्यास वास्तव पुढे येईल. त्यांची विश्वासार्हताही कायम राहील. अन्यथा यापुढे पक्षाविरोधात पक्ष नव्हे तर विविध पक्षांविरोधात नागरिक असे चित्र सोशल मीडियावर दिसल्यास आश्चर्य वाटू नये. नगरसेवक व इच्छुकांनीही वास्तवतेवर भर देण्याची गरज आहे, असे मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.

Nagpur | 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूरमध्ये, तर 96 वे संमेलन कुठे होणार?

Nagpur ST | एसटी संपामुळं बसची चाकंच फिरली नाहीत, खराब होण्याची भीती; नागपुरात दुरुस्तीसाठी काय व्यवस्थापन?

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.