सुंदर नागपूरसाठी स्मार्ट निर्णय; मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी रोबोट खरेदी; सफाई कामगारांना दिलासा

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, सध्या केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

सुंदर नागपूरसाठी स्मार्ट निर्णय; मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी रोबोट खरेदी; सफाई कामगारांना दिलासा
मॅनहोल्स साफसफाईसाठी रोबोट खरेदी
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 8:42 PM

नागपूर: शहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी कामगारांनी मॅनहोल्समध्ये (Manholes) प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे यासाठी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे (Nagpur Smart City) रोबोट खरेदी करण्यात येणार आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून यामुळे नागपूर शहरातील सफाई कामगारांच्या समस्येवर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मॅनहोल्सच्या देखभालीमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी हा उपक्रम नागपूर स्मार्ट सिटीच्या दृष्टीकोनातून केला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत रोबोट (Robot) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये मुंबईतील स्मार्ट सिटीचे चेअरमन डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी, संचालक मंडळ सदस्य अनिरुद्ध शेनवाई, आशिष मुकीम, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर आणि मुख्य वित्त अधिकारी नेहा झा यावेळी उपस्थित होत्या.

रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, सध्या केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे 10 जेटींग मशीन आणि 4 सक्शन (suction) मशीन उपलब्ध आहेत त्याच्या सहाय्याने मोठ्या मार्गावरील सिवर चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते पण लहान रोडवर हे काम करणए अडचणीचे ठरत असते. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे.

लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्येही वापर

आईओटीवर आधारित हे स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्येसुद्धा सिवर चेम्बरच्या स्वच्छेतेमध्ये मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोहरा नदी प्रदूषण मुक्त

याशिवाय नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हुडकेश्वर-नरसाळा भागात पोहरा नदीवर 20 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. संचालक मंडळाने हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी प्लांट) उभारण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. या माध्यमातून पोहरा नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या प्रयत्न आहे, असे गोतमारे यांनी सांगितले.

सफाई कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांना दिलासा

शहरात असणाऱ्या मॅनहोलमुळे अनेक लोकांना आपला जीव आणि अनेक जणांना जखमी व्हावे लागले आहे. शहरातरातील ठिकठिकाणी असणारे मॅनहोल ज्या वेळी स्वच्छ केले जातात त्या वेळी सफाई कामगारांनाही अनेकदा आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेकदा जखमी अवस्थेत मॅनहोलमधून बाहेर यावे लागले आहे. या गोष्टीवर पर्याय म्हणून नागपूर शहरात एक स्तुत्य योजना हाती घेण्यात आली आहे. नागपूरात मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट सिटीकडून आता रोबोट खरेदी केले जाणार आहेत. त्यामुळे आता सफाई कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांना दिलासा मिळणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.