Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Rainstorm | नागपुरात उन्ह पावसाचा खेळ; वादळ वाऱ्याचा फटका, 70 पेक्षा जास्त झाडं पडली

वादळी पावसामुळे सेमीनरी हिल्स भागातील फॉरेस्ट डिपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथे कडूनिंबांचे झाड मुळासह उन्मळून पडले. या झाडाचे पुनर्रोपन करून उद्यान विभागाद्वारे झाडाला नवजीवन देण्याचे कार्य करण्यात आले.

Nagpur Rainstorm | नागपुरात उन्ह पावसाचा खेळ; वादळ वाऱ्याचा फटका, 70 पेक्षा जास्त झाडं पडली
70 पेक्षा जास्त झाडं पडली Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 6:38 PM

नागपूर : गेल्या दोन दिवसांच्या वादळी पावसामुळे (Rainstorm) नागपूर शहरातील 70 पेक्षा जास्त भागामध्ये झाडांची पडझड झाली. रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता मनपाच्या अग्निशमन विभाग (Fire Department) आणि उद्यान विभागाच्या (Parks Department) चमूने सर्व भागांमध्ये तात्काळरित्या मदतकार्य सुरू केले. हे कार्य अहोरात्र सुरू होते अनेक भागांमध्ये बुधवारी सकाळपर्यंत कार्य सुरू राहिले. दोन्ही विभागांनी समन्वयाने केलेल्या कार्यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. पावसाळ्यात निर्माण होणा-या आपात्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज आहे. नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये सहकार्यासाठी मनपाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. जी.पी.ओ. चौकातील माजी मंत्री रणजीत देशमुख यांच्या बंगल्यापुढे झाडाची मोठी फांदी कोसळली. ही फांदी हटवून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी अग्निशमन आणि उद्यान विभागाच्या चमूने बुधवारी सकाळपर्यंत मदतकार्य केले.

या भागात झाले नुकसान

याशिवाय के.टी. नगर उद्यान जवळ, राम कुलर जवळ, गिट्टी खदान चौक, बिनाकी मंगळवारी, शिवाजी पुतळा दटके हॉस्पिटल जवळ, दटके हॉस्पिटल मागे कोतवाली रोड, सीताबर्डी पेट्रोल पम्प, शांतीनगर कॉलनी, आय.बी.एम.रोड मोठी मस्जीद जवळ, सी.आय.डी. ऑफिसजवळ, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, इंदोरा पाण्याची टाकी, इंदोरा गल्ली नं. पाच या भागांमध्ये नुकसान झालं. पडलेली झाडे आणि तुटलेल्या फांद्या हटविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. जरीपटका रिपलीकनगर येथे व जरीपटका चौधरी चौक येथे गाडी क्र.MH 49 U 3080 आणि गाडी क्र.MH 49 U 4775 वर झाड पडून नुकसान झाले. या दोन्ही गाड्यांवरील पडलेले झाड मनपा अग्निशमन विभागाव्दारे बाजूला करून दोन्ही गाड्या बाहेर करण्यात आल्या.

कडूनिंबाच्या झाडाला मिळाले नवजीवन

वादळी पावसामुळे सेमीनरी हिल्स भागातील फॉरेस्ट डिपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथे कडूनिंबांचे झाड मुळासह उन्मळून पडले. या झाडाचे पुनर्रोपन करून उद्यान विभागाद्वारे झाडाला नवजीवन देण्याचे कार्य करण्यात आले. बुधवारी सकाळपासून या कार्याला सुरुवात करून दुपारपर्यंत झाडाचे पुनर्रोपन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आपात्कालीन मदतीसाठी येथे संपर्क साधा

आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. -नागरिकांनी सहकार्यासाठी 0712-2567029, 2567777, 2540299, 2540188 या क्रमांकांवर किंवा 101 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.