Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी आज भोंग्यांच्या विषयाला हात घातला. राज ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. नागपुरात ते म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत, असं ते म्हणाले. भोंगे लावायचे तर लावा आमचा काही विरोध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका
रामदास आठवले, राज ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 1:19 PM

नागपूर : एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. भोंगे अनेक वर्षांपासून आहे. राज ठाकरे यांनी मंदिरात भोंगे लावावे. पण दोन धर्मात तणाव निर्माण करु नये. राज ठाकरे यांनी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग बदलला. राज्य सरकारने सांगितले परवानगी घेऊन भोंगे लावावे. राज ठाकरे (Raj Thackeray) हे मोठे नेते आहेत. पण, आपल्या देशात लोकशाही आहे. आपल्या देशात पेशवाई नाही, हे लक्षात ठेवावे. तुम्हाला भोंगे लावायचे तर लावा, असंही रामदास आठवले म्हणाले. भोंगे काढण्याला रिपब्लिकन (Republican) पक्षाचा विरोध असल्याचं ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही कधी भोंगे काढा, असं म्हटलं नाही. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे. त्यामुळं भोंगे काढायला लावणं बर नव्हे असंही आठवले यांनी सांगितलं.

सरकार बनवण्याचा प्लान काय

रामदास आठवले म्हणाले, राज्य सरकार पडावं असं मला वाटतं. पण सध्या सरकार पडण्यासारखी स्थिती नाही. सरकार पडलं तर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. सरकार पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सरकार पडलं तर विश्वास प्रस्तावाच्या वेळेस बरेच आमदार अनुपस्थित राहणार. आम्ही विश्वास प्रस्ताव जिंकू. आता कुणा आमदाराला निवडणूक नको, असंही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे आमदार नाराज आहेत. विश्वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेनेचे आमदार गैरहजर राहतील. बऱ्याच सेना आमदारांना भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे.

राज ठाकरेंनी लावावेत भोंगे

रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी आज भोंग्यांच्या विषयाला हात घातला. राज ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. नागपुरात ते म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत, असं ते म्हणाले. भोंगे लावायचे तर लावा आमचा काही विरोध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भूमिकेला माझा विरोध आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सबका साथ सबका विकास हवा आहे. भारतातील मुस्लीम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा. मस्जीदचे भोंगे काढण्याला विरोध आहे. मंदिरात राज ठाकरे यांनी भोंगे लावावे. राज ठाकरे यांना आधीच सुरक्षा आहे. केंद्र सरकार विचार करणार आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. केंद्र सरकार अत्यंत चांगलं चाललंय. 2024 मध्ये केंद्रात आमचंच सरकार येईल, असंही रामदास आठवले म्हणाले.

Hingoli Murder | मुलीच्या छेडछानीवरून वाद, हिंगोलीत गळ्यावर वार करून तरुणाचा खून

Chandrapur Leopard : चंद्रपुरात थंड हवेसाठी अंगणात झोपला; बिबट्याने 70 वर्षीय व्यक्तीस उचलून नेले

Buldana Tourism | बुलडाण्यात ऐतिहासिक स्मारकांची QR कोडमधून पर्यटकांना माहिती; राज्यातील पहिलाच प्रयोग सिंदखेड राजामधून…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.