नागपुरात आढळले 22 किलो वजनाचे दुर्मिळ कासव, वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार
सुमारे 22 किलो वजनाचे आणि दक्षिण भारतातच आढळणारे एक दुर्मिळ कासव चक्क नागपुरात रस्त्यावर फिरताना आढळले. वनविभागाने या कासवाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला दिले आहे.
नागपूर : सुमारे 22 किलो वजनाचे आणि दक्षिण भारतातच आढळणारे एक दुर्मिळ कासव चक्क नागपुरात रस्त्यावर फिरताना आढळले. वनविभागाने या कासवाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला दिले आहे. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कासव एकदम ठणठणीत असल्याची माहिती ट्रान्झिट सेंटरने दिली आहे. (rare Tortoise species of South India having 22 kg weight found in Nagpur)
कॉलिनीच्या रस्त्यावर चालत होते कासव
29 जूनला हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना हिंगणा येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीने एक भला मोठा कासव कॉलिनीच्या रस्त्यावर चालत असल्याचे कळवले. त्यानंतर आशिष निनावे कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कासवाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले.
दक्षीण भारतात आढळणारा दुर्मिळ कासव
बुधवारी ट्रान्झिटच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. हा कासव आपल्याकडे दुर्मीळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. कासवाचे वजन 22 किलो 200 ग्रॅम असून त्याची लांबी 83 सेंमी व रुंदी 51 सेंमी आहे. त्याच्या शरीराचा संपूर्ण घेर 165 सेंमी इतका आहे.
कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार
दरम्यान, या कासवाईची संपूर्ण तपासणी केल्यानंतर तो एकदम ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या कासवाला कोठेही कृत्रिम अधिवासात न ठेवता त्याला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल, असे वनविभागाने सांगितले आहे.
इतर बातम्या :
Delta Plus Update: नागपूरवर डेल्टा प्लसचं संकट? एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, प्रशासन ॲलर्ट
कोव्हिड काळात नागपुरातील खासगी रुग्णालयांविरुद्ध 580 तक्रारी, किती तक्रारी निकाली?
(rare Tortoise species of South India having 22 kg weight found in Nagpur)