Video – Nagpur | रिलायन्सच्या गोदामाला आग, कोट्यवधींचे नुकसान; आगीचे कारण काय?
जिल्ह्यातील निमजी गावात असलेल्या एका गोदामाला आज पहाटे आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. पण, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
नागपूर : निमजीतील रिलायन्स रिटेल लिमिटेड (Reliance Retail Ltd.) या गोदमाला भीषण आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास गोदामात आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण गोदामाला कवेत घेतलं. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) 5 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील निमजी गावात असलेल्या एका गोदामाला आज पहाटे आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. पण, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
गोदामात धान्य व किराणा वस्तू
पहाटे आग लागताच धावाधाव सुरू झाली. अग्निशमन विभागाला फोन करण्यात आले. अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. या गोदामात मोठ्या प्रमाणावर धान्य व इतर किराणा वस्तू ठेवण्यात आल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण, तोपर्यंत गोदामात ठेवलेल्या कोट्यवधींच्या साहित्याचे नुकसान या आगीत झाले.
आगीचे कारण काय
गोदामाला आग लागल्याच्या घटना घडतात. यात लाखो रुपयांचे नुकसान होते. ही आग का लागली, की कुणी लावली, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. आगीच कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.