MNC election 2022 : नागपूर मनपा निवडणुकांचं आरक्षण, 156 जागांपैकी 35 जागा ओबीसींकरिता आरक्षित
नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत पार पडल्यानंतर आता यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आलाय. यावर आता किती आक्षेप येतात हे पाहावं लागणार आहे.
नागपूर : नागपूर : नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी ओबीसींच्या जागांसाठी आज सोडत काढण्यात आली. महानगर पालिकेच्या एकूण 156 जागांपैकी 35 जागा ओबीसींकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 18 जागा ओबीसीच्या महिला प्रवर्गासाठी (Women Category) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी 12 मे रोजी प्रभाग रचना मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर 31 मे रोजी एससी, एसटी, एससी महिला व एसटी महिला जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बहाल केलंय. नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महालच्या टाऊन हालमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी (Municipal Commissioner Radhakrishnan) यांच्या उपस्थितीत ओबीसी, ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.
आक्षेपासाठी देण्यात आलाय वेळ
नागपूर मनपा सार्वत्रिक निवडणूक 2011 मध्ये एकूण प्रभाग – 52 होते. एकूण जागा 156 होत्या. अनुसूचित जाती (एससी) – 31 जागा (महिला एससी राखीव -16 ) होत्या. अनुसूचित जमाती (एसटी) — 12 जागा (महिला एसटी राखीव – 6 ) आहेत. ओबीसी – 35 (महिला ओबीसी राखीव – 18) आहेत. सर्वसाधारण – 78 (महिला सर्वसाधारण राखीव – 38 ) आहेत. नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत पार पडल्यानंतर आता यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आलाय. यावर आता किती आक्षेप येतात हे पाहावं लागणार आहे.
आरक्षणाबाबत हरकती, सूचना मागविल्या
आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आता शनिवारी 30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या शनिवार 30 जुलै ते मंगळवार 2 ऑगस्ट या कालावधीत दुपारी 3 वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे, अशी सूचना मनपा निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे. ओबीसींसाठी समाधानकारण जागा मिळाल्या नाहीत, हे खरं आहे. परंतु, राजकीय आरक्षण मिळालं, यामुळं कार्यकर्ते काही प्रमाणात समाधान व्यक्त करतात. आरक्षणाची सोडत निघाल्यानं उभेच्छुक आता निवडणुकीच्या प्राचाराच्या कामाला लागणार आहेत.