युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी विमानाने आणणार, राजनाथ-गडकरी यांची चर्चा; लिस्ट तयार!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याबाबत काल मी संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोललो आहे. सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट तयार केली जातेय. त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी विमानाने आणणार, राजनाथ-गडकरी यांची चर्चा; लिस्ट तयार!
राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:46 PM

नागपूरः रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाने (War) जग होरपळून निघणार असल्याची चिन्हे आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना विमानाने मायदेशी आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. गडकरी म्हणाले की, युक्रेनमध्ये विमान जाण्याची स्थिती निर्माण झाली की विमाने पाठवली जातील. नागपूरचे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याबाबत काल मी संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोललो आहे. सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट तयार केली जातेय. त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वयोश्रीचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत वयोश्री 2021 योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा नागपूरकरांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ घेता येईल. अपंगत्व वाट्याला आलेले आणि दिव्यांगासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. या योजनेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, या योजनेअंतर्गत व्हीलचेअर, वॅाकिंग स्टीक, ब्रेल स्लेट, श्रवणयंत्र, चष्मे ही उपकरणे मोफत देण्यात येणार आहेत. अशी 50 प्रकरणे आहेत. खरे तर लोकसंख्येच्या 10 टक्के असे लोक आहेत. नागपूर जिल्ह्यात ज्येष्ठ आणि दिव्यांगांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यांना या योजनेचा लाभ होईल. त्यासाठी वय 60 असल्याचा दाखला आणि उत्पन्न 15 हजाराच्या घरात असल्याचा दाखला लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

कसा घ्याल लाभ?

देशातील दिव्यांग, वृद्ध आणि गरजूंना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2017 मध्ये ही योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय वयश्री योजना असे तिचे नाव आहे. त्यासाठी वय साठच्या पुढे असावे लागते. दारिद्य्र रेषेखाली असलेल्या व्यक्तींना या योजना लाभ मिळतो. या योजनेचा फायदा घेण्यासाठी संबंधिताकडे आधार कार्ड असण्याची गरज आहे. सोबतच मोबाइल क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो आणि दारिद्य्र रेषेखालचे उत्पन्न दर्शविणारे कार्डही आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीला वैद्यकीय अहवाल जोडावा लागतो. अर्जदार वृद्धापकाळ पेन्शन घेत असेल, तर त्याची प्रतही जोडावी लागते. सोबतच ओळखपत्र म्हणून शिधापत्रिका किंवा वाहन चालविण्याचा परवाना काहीही जोडण्याची गरज आहे. राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना श्रवण यंत्र, चष्मा, व्हील चेअर, वॉकिंग स्टिक, ट्राइपॉडस्, क्वैडपोड, एल्बो कक्रचेस आदी उपकरणे मिळू शकतात.

संबंधित बातम्या :

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.