म्हणे, भारतासाठी नेहरुंचे नखाएवढेही योगदान नव्हते, संभाजी भिडे यांचं बरळणं सुरूच, राज्यभरात संतापाची लाट

संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेससह इतर पक्ष भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहेत.

म्हणे, भारतासाठी नेहरुंचे नखाएवढेही योगदान नव्हते, संभाजी भिडे यांचं बरळणं सुरूच, राज्यभरात संतापाची लाट
sambhaji bhideImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 11:01 AM

यवतमाळ | 30 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे बरळणे सुरूच आहे. महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करून इतिहासाचं विकृतीकरण संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यभरातून भिडेंविरोधात संतापाची लाट पसरली. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. विधानसभेतही भिडे यांच्या विधानाचे संतप्त पडसाद उमटले. भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. भिडेंचं हे वादग्रस्त विधान ताजं असतानाच त्यांनी अजून एक वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

यवतमाळमध्ये झालेल्या व्याख्यानात संभाजी भिडे यांनी नेहरूंवर टीका केली आहे. नेहरुंचं भारतावर थोडंही प्रेम नव्हतं. कोणतंही कर्तृत्व नसताना नेहरू पंतप्रधान झाले.नेहरूंचं भारतासाठी नखाएवढंही योगदान नाही. त्यांनी चीनसोबत केलेला पंचशील करार भारताला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने आपला पराभव केला आणि ईशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संभाजी भिडे यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केल्याने त्याचेही आता पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

भिडेंचं आज पुन्हा व्याख्यान

दरम्यान, शिवप्रतिष्ठानने आज वाशीमच्या काळे लॉनमध्ये संभाजी भिडे यांच जाहीर व्याख्यान होत आहे. भिडे यांच्या या व्याख्यानाला विविध पक्ष आणि आणि संघटनांनी विरोध केला आहे. संभाजी भिडे ज्या मार्गावरून जाणार त्या अकोला नाका येथे काँग्रेस, संभाजी ब्रिग्रेड, भीम टायगर, वंचित बहुजन आघाडीसह इतर सामाजिक संघटनेने काळे रुमाल दाखवून निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे वाशीममध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोठा बंदोबस्त

संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेससह इतर पक्ष भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहेत. काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे.

शिवप्रतिष्ठाने आज वाशीमच्या काळे लॉनमध्ये संभाजी भिडे यांच जाहीर व्याख्यान ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या परिसरात ये-जा करण्या व्यक्तीची विचारपूस केली जात आहे.

काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचे गोंदियातही पडसाद उमटले आहेत. गोंदियात सेवा दलाने गांधी चौकात भिडे यांच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध व्यक्त केला. यावेळी भिडेंना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली. यावेळी सेवा दलाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.