Nagpur Crime | शेजाऱ्याकडं वस्तू आणण्यासाठी पाठविले, घरी आलेल्या 9 वर्षीय मुलीवर नागपुरात अत्याचार

चिमुकली आईच्या शेजारी राहणार्‍या मैत्रिणीकडे जायची. मैत्रिणीच्या पतीने विकासच्या घरून वस्तू आणायला पाठविले. चिमुकली विकासच्या घरी गेली. यावेळी विकासची पत्नी कामावर गेली होती. मुलगाही घरी नव्हता. या संधीचा फायदा घेत विकासनं तिच्यासोबत जबरी शारीरिक सबंध प्रस्थापित केले. इकडं मुलगी उशीर झाल्यानंतरही घरी परतली नाही. आईची चिंता वाढली.

Nagpur Crime | शेजाऱ्याकडं वस्तू आणण्यासाठी पाठविले, घरी आलेल्या 9 वर्षीय मुलीवर नागपुरात अत्याचार
तांत्रिकाकडून अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 2:35 PM

नागपूर : नागपुरात धक्कादायक घटना उघडकीस आली. एका 9 वर्षीय चिमुकलीवर 50 वर्षीय व्यक्तीनं अत्याचार केला. एमआयडीसी पोलीस हद्दीत ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय आरोपीनं घरी कुणीच नसल्याचं पाहून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घरी आली नाही म्हणून तिची आई तिला शोधायला शेजाऱ्याकडं (Neighbor) गेली. तेव्हा ते आपत्तीजनक स्थितीत दिसून आले. आईनं मुलीची विचारपूस केल्यानंतर तिला कळलं की, यापूर्वीसुद्धा दोन वेळा आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार केला होता. हिंगणा रोडवरील (Hingana Road) सीम टाकळी येथील विकास बाबुराव पाटील असे आरोपीचे नाव आहे. मुलीने यापूर्वी देखील आरोपीने दोन वेळा असले कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाणे गाठले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घरी कुणी नसल्याचे पाहून नियत फिरली

चिमुकलीचे वडील हे कामानिमित्त बाहेर राहतात. आई आणि तिचा छोटा भाऊ हे नागपुरात राहतात. आई दोन्ही मुलांना सांभाळते. शेजारी पीडितेच्या आईची मैत्रीण राहते. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे जाणे-येणे होते. विकास पाटील हादेखील त्यांचा शेजारी आहे. विकासची पत्नी ही रुग्णालयात नर्स आहे. विकास कुठलीचं कामं करत नाही. विकास व नर्सला एक मुलं आहे. चिमुकली आईच्या शेजारी राहणार्‍या मैत्रिणीकडे जायची. मैत्रिणीच्या पतीने विकासच्या घरून वस्तू आणायला पाठविले. चिमुकली विकासच्या घरी गेली.

मुलीच्या आईने पाहिले नको त्या अवस्थेत

यावेळी विकासची पत्नी कामावर गेली होती. मुलगाही घरी नव्हता. या संधीचा फायदा घेत विकासनं तिच्यासोबत जबरी शारीरिक सबंध प्रस्थापित केले. इकडं मुलगी उशीर झाल्यानंतरही घरी परतली नाही. आईची चिंता वाढली. तिने मैत्रिणीच्या घरी विचारणा केली. त्यांनी विकास पाटीलकडे गेल्याचे सांगितलं. आई त्यांच्या घरी पोहोचली. तेव्हा विकास नको त्या अवस्थेत आढळला. आईने मुलीला विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार करण्यात आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.