Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honey Singh | रॅप गायक हनीसिंगला सत्र न्यायालयाचा दणका, पाचपावली पोलीस ठाण्यात यावचं लागणार?

यो यो हनीसिंगला नागपूर सत्र न्यायालयाने तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिलेत. हनीसिंगने अश्लील गाणी गाऊन यु ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

Honey Singh | रॅप गायक हनीसिंगला सत्र न्यायालयाचा दणका, पाचपावली पोलीस ठाण्यात यावचं लागणार?
याच पाचपावली पोलीस ठाण्यात हनी सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 12:52 PM

नागपूर : अश्लील गाणी गाऊन यु ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी रॅप गायक यो यो हनीसिंगला (rap singer Yo Yo Honey Singh) सत्र न्यायालयाने (Sessions Court) दणका दिलाय. हनीसिंगने आपल्या आवाजाचे नमुने देण्यासाठी आज नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्यात हजर व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिलाय. यापूर्वी 27 जानेवारी रोजी न्यायालयाने आवाजाचे नमुने देण्याकरिता 4 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पाचपावली पोलीस (Pachpavli Police) ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला होता. पण हनीसिंगने त्या आदेशाचं पालन केलं नाही. शिवाय त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून या आदेशात बदल करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावत आज पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे आज यो यो हनीसिंगला पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

काय आहे प्रकरण

हनी सिंगने यूट्यूबवर अत्यंत अश्लील गाणे अपलोड केलीत. अशी तक्रार आनंदपाल सिंग गुरमान सिंग जब्बल यांनी २०१५ साली पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल केली. पाचपावली पोलिसांनी इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या कलमान्वये हनीसिंग विरोधात गुन्हा दाखल केलाय. देश सोडून कुठेही जाऊ नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. विदेशात प्रवास करायचा असेल, तर त्याला न्यायालयाची परवानगी लागते. 25 जानेवारीला पोलीस ठाण्यात हजर राहायचे होते. पण, हनी सिंग गैरहजर राहिला. त्यासाठी त्याने गैरहजर राहण्याबाबत अर्ज केला होता. त्यानंतरच्या तारखांनाही तो गैरहजर राहिला. त्यामुळं न्यायालयाने हे आदेश दिलेत. यो यो हनीसिंगला नागपूर सत्र न्यायालयाने तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिलेत. हनीसिंगने अश्लील गाणी गाऊन यु ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

Video – नागपूर सीमेलगतच्या गावात शिरले अस्वल; रात्रीच्या अंधारात शिकारीचा बेत?, वनविभागाची शोधमोहीम

नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल.
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?.
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.