खामोश..! देशाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी आपल्या पार्टीचंसुद्धा ऐकत नाही, काँग्रेसमुळे देशात क्रांती

नोट बंदी असो की मग जीएसटी मी त्यावर बोललो आहे आणि बोलत राहणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मला म्हणाल्या होत्या. तुम्ही बंगालमध्ये जा त्या ठिकाणी तुमचा मोठा विजय होणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणीही यावेळी त्यांनी सांगितल्या.

खामोश..! देशाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी आपल्या पार्टीचंसुद्धा ऐकत नाही, काँग्रेसमुळे देशात क्रांती
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:26 PM

नागपूरः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख (Congress Leader Ranjit Deshmukh) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शत्रूग्न सिन्हा (Shatrugna Sinha) यांनी आपल्या हटके शैलीत खामोश म्हणत नागपूरातील कार्यक्रमाच्या भाषणाला प्रारंभ केला. आणि सगळी सभा आपल्या हातात घेतली. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांच्या आवाजात जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी शत्रुग्न यांनी सांगितले की, मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो कारण रणजित देशमुख यांच्या या कार्यक्रमाममध्ये मला सहभागी होता आले. रणजित देशमुख यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कलाकार म्हणून किंवा नेता म्हणून बोलत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या कार्यक्रमप्रसंगी शत्रुग्न सिन्हा म्हणाले की, रणजित देशमुख सगळ्यांचे प्रिय आहेच अगदी ते विरोधकांचेसुद्धा खूप प्रिय असल्याचे सांगत रणजित देशमुख यांच्या राजकीय वाटचालीविषयी आपले मत व्यक्त केले.तसेत यावेळी आशिष देशमुख यांच्या सोबत न्याय झाला पाहिजे ते चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वालाही राजकारणात वेगळी ओळख करुन दिले पाहिजे असे सांगत त्यांनी राजकीय मतंही व्यक्त केली.

काँग्रेस मोठ्या नेत्यांची पार्टी

काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी आणि काँग्रेसच्या वाटचालीविषयी काँग्रेस पार्टी ही मोठ्या नेत्यांची पार्टी आहे. या पार्टीत अनेक व्यक्तिमत्वं निर्माण झाली आहेत. या देशात काँग्रेसने अनेक मोठे कामं केली आहेत. काँग्रेसमुळेच मोठी क्रांती या देशात झाली असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाला किती मोठा इतिहास आहे हे ही त्यांनी सांगितले.

देशाचा विचार धरुनच कायम बोलत आलो

मी दुसऱ्या पक्षात होतो पण त्यावेळीही मी सरळ आणि साफ बोलत होतो. या आधी ज्या पक्षात होतो त्या पक्षातही मी देशाचा विचार धरुनच कायम बोलत आलो आहे. त्यामुळे देशाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी आपल्या पार्टीचंसुद्धा ऐकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

तुमचा मोठा विजय होणार…

नोट बंदी असो की मग जीएसटी मी त्यावर बोललो आहे आणि बोलत राहणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मला म्हणाल्या होत्या. तुम्ही बंगालमध्ये जा त्या ठिकाणी तुमचा मोठा विजय होणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणीही यावेळी त्यांनी सांगितल्या.

महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न

सध्याची भारतीय राजकारणातील परिस्थिती वेगळी आहे. महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न भेडसावत आहेत. आणि यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.