Video – नागपूरच्या सुदाम टॉकीजबाहेर नारेबाजी, BJP युवा मोर्च्याने जय श्री रामचे लावले नारे

सध्या देशात द काश्मीर फाईल्स सिनेमाविषयी मोठी उत्सुकता युवकांमध्ये पाहायला मिळते. नागपुरात नारे बाजी करणाऱ्यांमध्ये भाजप युवा मोर्च्याच्या (BJP Youth Front ) कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश होता. रात्री सुदाम टॉकीजसमोर (Sudam Talkies) उभे राहून त्यांनी घोषणाबाजी केली.

Video - नागपूरच्या सुदाम टॉकीजबाहेर नारेबाजी, BJP युवा मोर्च्याने जय श्री रामचे लावले नारे
नागपुरात नारेबाजी करताना भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 4:04 PM

नागपूर : नागपुरात द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) सिनेमाचा शो संपल्यानंतर सबकी माता भारत माता, जय श्री रामचे नारे भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी लगावले. मोठ्या प्रमाणात युवक सिनेमा बघायला पोहचले होते. नारे बाजी करणाऱ्यांमध्ये भाजप युवा मोर्च्याच्या (BJP Youth Front ) कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश होता. रात्री सुदाम टॉकीजसमोर (Sudam Talkies) उभे राहून त्यांनी घोषणाबाजी केली. सध्या देशात द काश्मीर फाईल्स सिनेमाविषयी मोठी उत्सुकता युवकांमध्ये पाहायला मिळते. ‘द काश्मीर फाईल्स’ बघण्यासाठी सध्या मोठी गर्दी होताना पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल आहेत. अश्यात काही ठिकाणी सिनेमा बघत असताना थिएटरमध्ये हिंदू-मुस्लिम वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नागपुरात नारेबाजी करताना भाजयुमोचे कार्यकर्ते

थिएटरमध्ये हिंदू-मुस्लिम वाद

नोएडा भागातल्या GIP मॉलमधल्या थिएटरमध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला होता. थिएटर प्रेक्षकांनी भरलेलं असताना अचानकपणे सिनेमा थांबण्यात आल्याचं सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. मुंबईतही थिएटर प्रेक्षकांनी भरलेलं असताना अचानकपणे सिनेमा थांबवण्यात आल्याचं सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. थिएटरचे मॅनेजर एजाज खान यांनी जाणीवपूर्वक चित्रपट थांबवला असा आरोप काही हिंदू संघटनानी लावला. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या पार्श्वभूमीवर नागपुरातही भाजप युवा मोर्चाही आक्रमक झालाय. नागपुरात काल रात्री त्यांनी भारत माता की जय तसेच जय श्री रामचे नारे दिले.

photo – वाशिममध्ये दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या, अपघातात शिक्षक ठार, दोन जण गंभीर 

नागपुरात भाजप नेते अविनाश ठाकरेंची सायकलवारी, व्यायाम आणि मतदारसंघातील जनसंपर्काचा मेळ

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.