Nagpur Library : समाजाने LGBT समूहास स्वतःत सामावून घ्यावे, सारथी संस्थेचे CEO निकुंज जोशी यांचे आवाहन

ह्युमन लायब्ररीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची ताकद व कुवत ही नागपूरकरांमध्ये अधिक आहे. रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या संकल्पसिद्धीची पहिली पायरी आज नागपूरकरांनी गाठली.

Nagpur Library : समाजाने LGBT समूहास स्वतःत सामावून घ्यावे, सारथी संस्थेचे CEO निकुंज जोशी यांचे आवाहन
‘रूबरू’ ह्युमन लायब्ररीचे उद्घाटन
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:18 PM

नागपूर : समाजाने LGBT समूहास स्वतःत सामावून घ्यावे, त्यांना वेगळी वागणूक देऊ नये असे आवाहन सारथी संस्थेचे (Sarathi Society) CEO निकुंज जोशी यांनी केले. नागपुरात प्रथमच सुरू होत असलेल्या ‘रूबरू’ ह्युमन लायब्ररीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. आज श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे झालेल्या उद्‌घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया अय्यर होत्या. ठाणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विक्रम भागवत (Vikram Bhagwat) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच मंचावर रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर स्वाती धर्माधिकारी (Dr. Swati Dharmadhikari) उपस्थित होत्या.

समाजाने आमच्याशी एकरूप होण्याची गरज

यावेळी रूबरू ह्यूमन लायब्ररीचे पुस्तक म्हणून आपला जीवनानुभव सांगणाऱ्या निकुंज जोशी यांनी समाजात सततची मिळणारी निकृष्ट वागणूक यावर खेद दर्शविला. स्त्री पुरुष यासारखेच आम्ही सुद्धा एक समाजाची प्रकृती आहोत आम्ही जसे आहोत तसे समाजाने आमच्याशी एकरूप होण्याची गरज आहे, ही बाब त्यांनी तळमळीने मांडली. निकुंज जोशी यांच्याप्रमाणेच बाईक रायडर आणि ट्रॅव्हलर स्नेहल वानखेडे यांनीही आपले अनुभव व्यक्त केले.

संकल्पसिद्धीची पहिली पायरी

ह्युमन लायब्ररीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची ताकद व कुवत ही नागपूरकरांमध्ये अधिक आहे. रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या संकल्पसिद्धीची पहिली पायरी आज नागपूरकरांनी गाठली. अशी पावती सुप्रसिद्ध लेखक विक्रम भागवत यांनी दिली. ह्यूमन लायब्ररीच्या निमित्ताने समाजाने आपला परीघ ओलांडायला हवा, असेही त्यांनी म्हटले. ह्यूमन लायब्ररी ही अभिनव कल्पना आहे. माणसांच्या गोष्टीत विश्वरूप दर्शन घडत असतं. प्रत्येक माणसाच्या कृती व वागणुकीमागे विशेष असे कारण दडलेले असते, हे या निमित्ताने समजून घेता येईल. तसेच माणसाला माणूस वाचता येणे आणि समजून घेता येणं हे सर्वात कठीण कार्य या उपक्रमाच्या निमित्ताने साधल्या जाईल अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

यांचा करण्यात आला सत्कार

कार्यक्रमास रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या पहिल्या टप्प्यातील पुस्तक म्हणून व्यक्त होणारे व्यसनाधीनतेवर मात करणारे तुषार नातू, लैंगिकतेबाबत महत्वाचे कार्य करणारे निकुंज जोशी, बाईक रायडर स्नेहल वानखेडे, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध लढलेल्या रुबीना पटेल आणि कॅन्सर सारख्या रोगाला सामोरे जाणारे रणजीत उंदरे उपस्थित होते. त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी केले. परिचय डॉक्टर विनिता हिंगे यांनी करून दिला. संचालन आभा मुळे यांनी केले. आभार वर्षा बाशु यांनी मानले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.