लवकरच पक्ष प्रवेशाचा मोठा भूकंप राज्यात होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं

राज ठाकरे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही.

लवकरच पक्ष प्रवेशाचा मोठा भूकंप राज्यात होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 12:58 PM

नागपूर : सामनाला अर्थसंकल्प कळतो का. सामनामध्ये लिहिणाऱ्या कधी निवडणुका लढल्या आहेत का? असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उत्कृष्ट अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. विदर्भाला शिल्लक निधी मिळाला. मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पाला निधी मिळाला. विदर्भाचे सुपुत्र म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. महाविकास आघाडीने विदर्भाला सापत्न वागणूक दिली. विदर्भातील क्रीडा मंत्री असताना निधी मिळत नव्हता. आता 100 कोटी रुपये नागपूर विभागीय क्रीडा संकुलला मिळाले. संताची भूमी असल्याने तीर्थक्षेत्राला मोठा निधी मिळाला.

14 तारखेला मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. पक्ष प्रवेशाचे मोठे भूकंप राज्यात बसणार आहे. आमचे सरकार बोलायची कढी नाही, तोंडचे वाफे आम्ही काढत नाही. असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना 24 तास वीज आणि पाणी मिळेल, यासाठी तरतूद बजेटमध्ये आहे. 2024-25 चा अर्थसंकल्प यापेक्षा चांगला असेल. असं कुठलच क्षेत्र नाही ज्यासाठी बजेटमध्ये तरतूद नाही. शिवाजी महाराजांच्या काळातील नीतीचे दाखले यात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या बजेटमधून दिसत आहेत. रोजगार निर्मिती करणारा बजेट आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव नाही

राज ठाकरे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही. बजेट सुरू असताना विरोधी पक्षाच्या आमदारांचे चेहरे छोटे झाले होते. त्यांना पश्चाताप होत असल्याचं दिसत होतं. महायुतीने सत्तेपासून पैसा, पैशातून सत्ता हेच ध्येय होतं. पण हे सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदाराला देखील असं वाटत आहे.

एससी, एसटीकरिता ज्या सवलती असतील त्यासाठी ते पर्याय पाहिले जात असतील. पण ही सवलत इतर समाजाला देखील मिळणे आवश्यक आहे. मी याची अजून माहिती घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं. उध्दव ठाकरे गट प्रत्येक तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन करणार ते फुसका बार ठरणार आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांना काही दिलं नाही आणि आता आंदोलन करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शिंदे-फडणवीस जोडी धनाजी संताजीची जोडी

शिंदे-फडणवीस जोडी धनाजी संताजीची जोडी आहे. दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत काम करण्याचे आमचे संस्कार आहेत. उध्दव ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले त्यांनी आम्हाला सांगू नये. अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागल्या सरकारपेक्षा आमचं सरकार दुपटीने मदत करेल, असं आश्वासनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.