AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरातील स्विगीच्या ग्राहकांना मोठी सुट, काय आहे ही भन्नाट ऑफर जाणून घ्या

स्विगीच्या ग्राहकांना चांगल्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारता यावा, यासाठी ही सुट देण्यात आली. यामुळे रेस्टॉरंट इंडस्ट्रीलाही मदत मिळणार आहे.

नागपुरातील स्विगीच्या ग्राहकांना मोठी सुट, काय आहे ही भन्नाट ऑफर जाणून घ्या
| Updated on: Apr 24, 2023 | 8:02 PM
Share

नागपूर : स्विगी हे देशातील ऑनलाईन फूड डिलीव्हरी प्लॅटफार्म आहे. स्विगी डाईनआऊट (Swiggy Dineout) या अॅपच्या माध्यमातून ग्रेट इंडियन रेस्टॉरंट फेस्टिव्हल (Great Indian Restaurant Festival) सुरू केलंय. हे फेस्टिव्हल ४ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. अशाप्रकारच्या फेस्टिव्हलची ही सातवी ए़डिशन आहे. स्विगी डीनआऊटच्या ग्राहकांना ५० टक्क्यांपर्यंत सुट मिळणार आहे. ही सुट नागपुरातील ४० रेस्टॉरंटमध्ये लागू राहील. एचडीएफसी क्रेडीट कार्डधारकांना (HDFC Credit Card) १५ टक्के अधिक सुट मिळणार आहे.

या हॉटेलमधून मिळणार सुट

नागपुरातील खवय्यांसाठी ही एक पर्वणी आहे. स्विगी डाईनआऊट हे नागपुरातील काही मोठ्या हॉटेलमध्ये लागू होणार आहे. ही सुविधा टीडीएस रेस्टो लाँज, ली मेरीडीअन, हॉटेल हरदेव, हॉटेल लेजंट इन, द प्राईड हॉटेल नागपूर आणि हाय स्टीक येथे लागू राहणार आहे.

ग्रेट इंडियन रेस्टॉरंट फेस्टिव्हल

ग्रेट इंडियन रेस्टॉरंट फेस्टिव्हलचे ग्राहक हे त्यांचे आवडते खाद्यपदार्थ डीसकाऊंट रेटमध्ये खाऊ शकणार आहेत. आम्ही पहिल्यांदाच ग्रेट इंडियन रेस्टारंट फेस्टिव्हल अॅप लाँच केलाय.

dineout 2 n

अंकित महरोत्रा म्हणतात,…

स्विगीच्या ग्राहकांना चांगल्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारता यावा, यासाठी ही सुट देण्यात आली. यामुळे रेस्टॉरंट इंडस्ट्रीलाही मदत मिळणार आहे. असं स्विगी डाईनआऊटचे व्हाईस प्रेसिडेंट अंकित महरोत्रा यांनी सांगितलं.

देशातील टॉप फूड प्लॅटफार्म

स्विगी डाईनआऊट हे ३४ शहरांमधील २१ हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंटमधून फूड डिलीव्हरी करत आहे. देशातील हे एक टॉप फूड प्लॅटफार्म आहे. डायनिंग, लाँज बार, पब्स, केफ्स, क्युक सर्व्हिस रेस्टॉरंट आणि काही वैशिष्ट्ये आहेत. स्विगीचा एखादा सदस्य अधिक खवय्यांना या सुटचा लाभ मिळवून देऊ शकतो.

स्विगीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होमची सुविधा दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्याची सक्ती केली जाणार नाही. कर्मचारी तिथं असतील तिथून काम करू शकतील. कर्मचारी घरूनही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तीन महिन्यातून एक वेळा कर्मचाऱ्याला कार्यालयात यावे लागेल. ग्राहकांसोबतच कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार स्विगी करतो.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.